Atumobile launch Atum 1.0 electric motorcycle; 7 rs for 100 KM Range | "7 रुपयांत 100 किमी"! हैदराबादच्या कंपनीने अ‍ॅटम बॉम्बच फोडला; मोटरसायकलची किंमत 50 हजार

"7 रुपयांत 100 किमी"! हैदराबादच्या कंपनीने अ‍ॅटम बॉम्बच फोडला; मोटरसायकलची किंमत 50 हजार

नवी दिल्ली : हैदराबादची इलेक्ट्रीक व्हेईकल कंपनी  Atumobile प्रायव्हेट लिमिटेडने एक खतरनाक मायलेज देणारी इलेक्ट्रीक बाईक बाजारात आणली आहे. या बाईकचे नाव आहे Atum 1.0.  या बाईकची बेस प्राईजही 50000 रुपये आहे. Atum 1.0 ही ICAT ने मंजुरी दिलेली कमी स्पीडची इलेक्ट्रीक बाईक आहे. यामुळे या बाईकसाठी कोणतेही रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही,  तसेच ड्रायव्हिंग लायसनचीही गरज राहणार नाही. 


या बाईकमध्ये पोर्टेबल लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे, जी 4 तासांपेक्षा कमी वेळात फुल चार्ज होते. कंपनीच्या दाव्यानुसार एकदा चार्ज झाली की बाईक 100 किमीची रेंज देते. ही बॅटरी दोन वर्षांच्या वॉरंटीसह येते. तसेच ही बाईक विविध रंगात उपलब्ध आहे. Atum 1.0 मध्ये लाईटवेट 6 किलोचे बॅटरी पॅक देण्यात आले आहे. ही बॅटरी काढता येत असल्याने युजर ही बॅटरी काढून कुठेही थ्री पिन सॉकेटद्वारे चार्ज करू शकणार आहेत. 


10 किमी धावण्यासाठी खर्च किती? 

कंपनीचा दावा आहे की, 100 किमीच्या रेंजसाठी ही बाईक 7 ते 10 रुपये खर्च करते. म्हणजेच 1 युनिट वीज चार्जिंगसाठी वापरली जाते. कंपनीनुसार बाजारात उपलब्ध असलेल्या बाईकचा 100 किमीचा खर्च हा 80 ते 100 रुपये आहे. या इलेक्ट्रीक बाईकमध्ये 20X4 फॅट बाईक टायर देण्यात आलेले आहेत. या बाईकमध्ये लो सीट हाईट,  LED हेडलाइट, इंडीकेटर्स, टेललाइट आणि फुल टिजिटल डिस्प्ले देण्यात आला आहे. Atum 1.0 इलेक्ट्रिक बाइक तीन वर्षांच्या संशोधनानंतर बनविण्य़ात आली आहे. 

Tata Harrier चे नवे व्हेरिअंट लाँच; MG Hector, क्रेटाला देणार थेट टक्कर


ही इलेक्ट्रीक बाईक कंपनीने तेलंगानाच्या ग्रीनफील्ड मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये तयार केली आहे. या प्रकल्पाची क्षमता 15000 युनिट असून ती आणखी 10000 युनिटनी वाढविता येते. 

Web Title: Atumobile launch Atum 1.0 electric motorcycle; 7 rs for 100 KM Range

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.