शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

मराठा, धनगर आरक्षणावर मुख्यमंत्र्यांचं मोठं स्पष्टीकरण; विधानसभेत भुजबळ आक्रमक, शाब्दिक चकमक 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 12:30 PM

मराठा, धनगर आणि मुस्लिम आरक्षणावरून आज विधानसभेमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.

मुंबई - मराठा, धनगर आणि मुस्लिम आरक्षणावरून आज विधानसभेमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. आक्षेप आणि स्पष्टीकरणाच्या शाब्दिक चकमकीही उडाल्या. मराठा आणि धनगर आरक्षणाबाबतचे अहवाल सभागृहासमोर न ठेवल्याने विरोधकांनी सरकारला धारेवर धरले, तसेच आरक्षणामधील तरतुदींबाबतही विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले. आरक्षमाबाबत विरोधकांनी उपस्थित केलेल्या शंकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले. तसेच तामिळनाडू आणि कर्नाटकच्या धरतीवर महाराष्ट्रातील आरक्षणाचा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. विधानसभेतील आजच्या कामकाजाला सुरुवात झाल्यावर सभागृहात आरक्षाच्या मुद्यावर जोरदार चर्चा झाली. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारमधील मंत्र्यांकडून वेगवेगळी मते मांडली जात आहेत. त्यामुळे मराठा समाजाच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे, असे अजित पवार म्हणाले. तसेच मुस्लिम आरक्षणाबाबत सरकारकडून काहीही हालचाली होत नसल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. तर छगन भुजबळ यांनी विविध मर्यादांमुळे आता ओबीसींकडे केवळ १७ टक्केच आरक्षण उरले असल्याचे सांगत मराठ्य़ांचा समावेश एसईबीसीमध्ये केल्याने त्यांचाही भार ओबीसीं प्रवर्गावर पडू शकतो, अशी भीती व्यक्त केली. तसेच आरक्षाणाचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकारने कायदा करून मर्यादा वाढवावी, अशी मागणी त्यांनी केली. तर ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांनी मराठा आणि धनगर आरक्षणाबाबतचे अहवाल सभागृहात मांडण्यास हरकत काय, असा सवाल केला.   विरोधकांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी सविस्तर उत्तर दिले. मराठा आरक्षणाबाबत सभागृहात निवेदन देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ''मराठा आरक्षणाबाबत सध्या कायदेतज्ज्ञांकडून माहिती घेतली जात आहे. अपवादात्मक परिस्थितीमध्ये आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा अधिकार राज्यांना आहे. तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये आरक्षणाची मर्यादा वाढवण्याता आलेली आहे. त्याच धरतीवर महाराष्ट्रातही आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला आहे."  तसेच संसदेने आरक्षणाची मर्यादा वाढवली तर ती चांगलीच बाब असेल. मात्र ते होईल तेव्हा होईल, सध्या आपल्या हाती जे करण्यासारखे आहे ते केले पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.  

टॅग्स :reservationआरक्षणMaratha Reservationमराठा आरक्षणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारChagan Bhujbalछगन भुजबळ