साखळी बॉम्बस्फोट : उच्च न्यायालयाच्या निर्णयाला 'सर्वोच्च' स्थगिती; आरोपी पुन्हा तुरुंगात जाणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 11:41 IST2025-07-24T11:39:44+5:302025-07-24T11:41:11+5:30

Mumbai Local Train bomb blasts Case: मुंबई साखळी बॉम्ब स्फोट प्रकरणी आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. आरोपी तुरुंगाबाहेर आले आहेत.

Big Breaking: Mumbai Local Train bomb blasts Case, Supreme Court stays High Court decision; Will the 11 accused go back to jail? | साखळी बॉम्बस्फोट : उच्च न्यायालयाच्या निर्णयाला 'सर्वोच्च' स्थगिती; आरोपी पुन्हा तुरुंगात जाणार?

साखळी बॉम्बस्फोट : उच्च न्यायालयाच्या निर्णयाला 'सर्वोच्च' स्थगिती; आरोपी पुन्हा तुरुंगात जाणार?

मुंबई साखळी बॉम्ब स्फोटातील आरोपींची पुरावा नसल्याने मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती. या निर्णयाला राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिली आहे. 

भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम...

मुंबई साखळी बॉम्ब स्फोट प्रकरणी आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. आरोपी तुरुंगाबाहेर आले, त्यावर राज्य सरकारला हरकत नाही. सर्वोच्च न्यायालयाने भविष्यात आदेश दिला तर तुरुंगातून बाहेर आलेल्या ११ आरोपींना पुन्हा तुरुंगात जावे लागणार आहे, सध्यातरी हे आरोपी तुरुंगाबाहेरच असणार आहेत. 

हा निर्णय दुसऱ्या मकोका केसमध्ये वापरली जाऊ नये, अशी मागणी महाराष्ट्र सरकारने केली होती. तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयला स्थगिती दिली आहे. 

११ जुलै २००६ याच दिवशी मुंबईची जीवनवाहिनी बॉम्बस्फोटांनी हादरली होती. पश्चिम उपनगरीय रेल्वेच्या सात स्थानकांवर बॉम्बस्फोट घड़विण्यात आले होते. प्रेशर कुकरमध्ये बॉम्ब बनवून ते घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबई लोकलमध्ये ठेवण्यात आले होते. या साखळी स्फोटांमध्ये २०९ निष्पाप मुंबईकरांचा बळी गेला होता. तर ७१४ जण जखमी झाले होते. या प्रकरणी १२ जणांना अटक करण्यात आली होती. एका आरोपीचा तुरुंगातच मृत्यू झाला होता. उर्वरितांना कनिष्ठ न्यायालयाने शिक्षाही दिली होती. यानंतर यापैकी ११ आरोपी उच्च न्यायालयात गेले होते. तिथे त्यांना दोन दिवसांपूर्वीच निर्दोष सोडण्यात आले होते. 
 

Web Title: Big Breaking: Mumbai Local Train bomb blasts Case, Supreme Court stays High Court decision; Will the 11 accused go back to jail?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.