शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

BIG BREAKING: राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2019 17:02 IST

राज्यातील शेतकऱ्यांचे थकीत कर्ज माफ करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत केली आहे. 

नागपूर - अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने कंबरडे मोडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे.  राज्यातील शेतकऱ्यांचे  ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत असलेले दोन लाख रुपयांपर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत केली आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना असे नाव या योजनेला देण्यात आले आहे. 

 राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत मोठी घोषणा केली. उद्धव ठाकरे म्हणाले की, ''गेल्या काही काळात नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांचे ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्याची घोषणा आम्ही करत आहोत. शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येईल. कर्जमाफीच्या प्रकियेची सुरुवात ही मार्च महिन्यांपासून होईल. तसेच कर्जमाफीचे पैसे हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केले जातील. तसेच नियमित कर्ज भरणाऱ्यांसाठी येत्या १५ दिवसांत योजना जाहीर केली जाईल.'' 

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण कर्जमाफीवरून सरकारला धारेवर धरले. सरकटक कर्जमाफी आणि सातबारा कोरा करण्याच्या घोषणेचे काय झाले असा सवाल करत देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहातून सभात्याग केला. 

यावेळी राज्यातील राजधानीपासून दूरच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना आपल्या समस्या थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवता याव्यात यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  मोठी घोषणा केली आहे. आता प्रत्येक जिल्ह्यात सीएमओ अर्थात मुख्यमंत्र्यांचे कार्यालय स्थापन करण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्रMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारFarmerशेतकरीagricultureशेती