शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

बीड बायपासवर भरधाव कंटेनर पुलाला धडकला अन्  जीवनमृत्यूच्या रेसमध्ये तो जिंकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2017 14:04 IST

रस्त्यावरील लघू पुलाचा अंदाज न आल्याने भरधाव कंटेनर सरळ कठड्याला धडकडला. या भीषण अपघातात कंटेनरचा समोरच्या भागाचा चुरडा होत दोन जण जखमी झाले.

औरंगाबाद: रस्त्यावरील लघू पुलाचा अंदाज न आल्याने भरधाव कंटेनर सरळ कठड्याला धडकडला. या भीषण अपघातात कंटेनरचा समोरच्या भागाचा चुरडा होत दोन जण जखमी झाले. यातील एक  जण मात्र कठडा आणि कंटेनरमध्ये अडकून पडला. सुमारे चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर कटरने पत्रा कापून आणि क्रेनच्या सहायाने कंटेनर उचलून त्यास मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले. जीवनमरणाच्या स्पर्धेत तरूणाने मृत्यूवर विजय मिळविला. ही घटना बीडबायपास रोडवरील बाळापुर फाट्याजवळ पहाटे ३.३०  वाजच्या सुमारास घडली.अनिल हरी हराडे (२०,रा. बलसुर, ता.उमरगा,जि.लातुर) असे जखमी चालकाचे नाव आहे.  एमआयडीसी सिडको पोलिसांनी सांगितले की, जखमी अनिल हराडे हा वाहनचालक आहे.तो कंटेनरमध्ये मैदा घेऊन धुळे जिल्ह्यातील अमळनेर येथून अनंतापुरकडे(मध्यप्रदेश) जात होता. त्याच्यसोबत आणखी एक चालक आणि  क्लीनर होता. रात्रभर अनिल गाडी चालवित असल्याने औरंगाबादच्या बीडबायपासमार्गे पुढे जात असताना त्याला झोपेची डुलकी लागली आणि त्याचे कंटेनवरील नियंत्रण सुटले. यावेळी  बाळापुर फाट्याजवळील पुलाच्या क ठड्याला कंटेनर धडकून अडकला. या अपघातात अनिलशेजारी बसलेल्या एक जण किरकोळ जखमी झाला तर क्लिनरला कोणतीही दुखापत झाली नाही. हा अपघात एवढा भिषण होता की कंटेनरचा समोरच्या भागाचा चुरडा झाला आणि चालक अनिल याच्या पोटात स्टेअरिंग घुसले आणि हा कमेरेपासून खालीचा भाग  कंटेनरच्या केबिनमध्ये अडकला. त्याला जागेवरून हालचालही करताना प्रचंड वेदना होत. पहाटे साडेतीन चार वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी सिडको ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र माळाळे, उपनिरीक्षक सिताराम केदारे आणि कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी कंटेनरमध्ये अडकलेल्या चालकास बाहेर काढण्याचा प्रयत्न केला,मात्र ते त्यांना शक्य झाले नाही.शेवटी त्यांनी पत्रा कापणाºयास आणि क्रेनचालकास घटनास्थळी बोलावून घेतले. चार तासाच्या प्रयत्नानंतर कंटेनरच्या केबिनचा पत्रा कापल्यानंतर जखमी अनिलला बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले. यावेळी अग्नीशमन दलाच्या जवानांनीही त्यास बाहेर काढण्यासाठी मदत केली. यानंतर चालकाला घाटी रुग्णालयात दाखल केले.

टॅग्स :AccidentअपघातAurangabadऔरंगाबाद