भिवंडीत संतप्त शेतकऱ्यांनी एमआयडीसीसाठीच्या जमीन मोजणीस केला विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 09:05 PM2021-11-15T21:05:06+5:302021-11-15T21:08:50+5:30

भिवंडी तालुक्यात फोफावलेल्या गोदाम व्यवसायामुळे या भागातील जमिनींना सोन्याचा भाव आला आहे.

in Bhiwandi angry farmers oppose land survey for MIDC | भिवंडीत संतप्त शेतकऱ्यांनी एमआयडीसीसाठीच्या जमीन मोजणीस केला विरोध

भिवंडीत संतप्त शेतकऱ्यांनी एमआयडीसीसाठीच्या जमीन मोजणीस केला विरोध

Next

नितिन पंडीत

भिवंडी:भिवंडी तालुक्यात फोफावलेल्या गोदाम व्यवसायामुळे या भागातील जमिनींना सोन्याचा भाव आला असताना या जमिनीवर डोळा ठेवून एमआयडीसी च्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून भिवंडी तालुक्यातील तब्बल २६० एकर शेतजमीन खाजगी विकासकास एमआयडीसी उभारण्यासाठी आंदण देण्याचा प्रकार भिवंडी तालुक्यात होत असून त्यास स्थानिक शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे. सोमवारी शेतजमिनीची मोजणी करण्यसाठी एमआयडीसी ,भूमिअभिलेख विभागाचे अधिकारी स्थानिक पडघा पोलिसांच्या संरक्षणात आले असता ग्रामस्थांनी त्यांना रस्त्यात अडवीत मोजणीस विरोध करीत आपला संताप व्यक्त केला .त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश कटके यांनी संबंधित अधिकारी शेतकरी यांच्यातील वादा संदर्भात चर्चा घडवून आणण्या साठी बैठक आयोजित करण्याचा तोडगा सुचवीत मोजणी कार्यक्रम रद्द केला .

भिवंडी तालुक्यातील पडघा नजीकच्या भादाणे आतकोली येथील भादाणे इंडस्ट्रीयल अँड लॉजेस्टिक पार्क साठी २०० एकर तर आतकोली इंडस्ट्रीयल अँड लॉजेस्टिक पार्क साठी ६० एकर जमीन एमआयडीसी ने १८ मार्च २०२० रोजी पार पडलेल्या ३८६ व्या संचालक मंडळाच्या सभेत १५ ( ब ) कलमानव्ये मंजूर केली . या जमिनीत सुमारे ६८ जमीनधारक व ३५ घरे असूनही या बाबत कोणतीही शासकीय अधिसूचना अथवा स्थानिक शेतकऱ्यांच्या सूचना न मागविताच ही जमीन खाजगी विकासकांना देण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप स्थानिक शेतकरी त्याच बरोबर शिवसेना ओबीसी आघाडी तालुकाध्यक्ष तथा स्थानिक पंचायत समिती सदस्य प्रकाश भोईर यांनी करीत येथील भूसंपादन शेतकऱ्यांना शेतजमिनीतून बेदखल करून देशोधडीला लावणारे असल्याची संतप्त प्रतिक्रिया भोईर यांनी दिली आहे .

विशेष भादाणे आतकोली भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी उद्योजकांना भाडेतत्वावर देण्यासाठी एका व्यवसायिकने शेतकऱ्यांसोबत करार केला होता याच व्यवसायिकने एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून बळकाविण्याचा कट रचल्याचा आरोप देखील स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे.
 

Web Title: in Bhiwandi angry farmers oppose land survey for MIDC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.