साध्वी प्रज्ञासिंह यांना गावबंदी करून तोंड काळे करणाऱ्या गावांना भीम आर्मी देणार पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 16:07 IST2019-04-24T16:06:17+5:302019-04-24T16:07:57+5:30

भाजपच्या या कृतीवरून त्यांचे देशप्रेम किती बेगडी आहे हा त्यांनी त्यांच्याच कृतीतून दाखवून दिलेले आहे, अशी टीका कांबळे यांनी केली.

Bhim Army will give award to the villages; those villages by making villagers confine Sadhvi Pragya Singh and make face black | साध्वी प्रज्ञासिंह यांना गावबंदी करून तोंड काळे करणाऱ्या गावांना भीम आर्मी देणार पुरस्कार

साध्वी प्रज्ञासिंह यांना गावबंदी करून तोंड काळे करणाऱ्या गावांना भीम आर्मी देणार पुरस्कार

ठळक मुद्दे साध्वी प्रज्ञासिंह यांना लोकसभेची उमेदवारी देऊन भाजपने देशातील शहीदांचा अवमान केला असल्याची टीका महाराष्ट्र भीम आर्मीने केली आहे.अशा गावांना महाराष्ट्र भीम आर्मीच्यावतीने देशभक्त गाव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल असे कांबळे यांनी सांगितले.

मुंबई - देशासाठी आपले प्राण गमावणारे वरीष्ठ पोलीस अधिकारी शहीद हेमंत करकरे यांचा अवमान करणाऱ्या मालेगाव बाॅम्बस्फोटातील प्रमुख आरोपी व  कथित साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना लोकसभा निवडणुकीत गावबंदी करून तोंड काळे करणाऱ्या गावांचा महाराष्ट्र भीम आर्मीच्यावतीने पुरस्कार देऊन गौरव करणार असल्याची घोषणा भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रमुख अशोकभाऊ कांबळे यांनी केली आहे. साध्वी प्रज्ञासिंह यांना लोकसभेची उमेदवारी देऊन भाजपने देशातील शहीदांचा अवमान केला असल्याची टीका महाराष्ट्र भीम आर्मीने केली आहे.

आपण श्राप दिल्यामुळेच हेमंत करकरे यांची हत्या झाली असे संतापजनक वक्तव्य करतानाच 26/11 आतंकवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी अजमल कसाब याची भलावण करणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी शहीद हेमंत करकरे यांच्यासह देशासाठी शहीद झालेल्या शहीद वीर जवांनांचाही अपमान करून आपली देशविरोधी मानसिकता स्पष्ट केली असतानाही देशप्रेमाचा बागुलबुवा उभा करणा-या भाजपने त्यांना भोपाळ लोकसभा मतदारसंघातून तिकीट देण्याचा घाट घातला आहे. भाजपच्या या कृतीवरून त्यांचे देशप्रेम किती बेगडी आहे हा त्यांनी त्यांच्याच कृतीतून दाखवून दिलेले आहे, अशी टीका कांबळे यांनी केली.

भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शहीदांच्या नावाने देशभर मतांचा जोगवा मागत असतानाच त्यांचाच पक्ष शहीदांचा अवमान करणाऱ्या आणि एका आरोपीला लोकसभेचे तिकीट देऊन आपल्या देशभक्तीचे प्रमाण देत आहे त्यांच्या या कृतीचा देशभरातून विरोध होत असला तरी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे तिकीट भाजपा कायम करीत असेल तर भोपाळमधील देशप्रेमी जनता प्रचारासाठी फिरणाऱ्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे तोडं काळे करावे, चप्पलाचा हार घालून गाढवावर फिरवणे अशा वेगळ्या प्रकारे सत्कार केल्याशिवाय राहणार नाही. अशा गावांना महाराष्ट्र भीम आर्मीच्यावतीने देशभक्त गाव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल असे कांबळे यांनी सांगितले.

Web Title: Bhim Army will give award to the villages; those villages by making villagers confine Sadhvi Pragya Singh and make face black