शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Bhaiyyuji Maharaj Suicide: भय्यूजी महाराज भाजपाच्या दबावाखाली होते; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2018 16:52 IST

आत्महत्येची सीबीआय चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी

मुंबई: अध्यात्मिक गुरु भय्याजी महाराज यांनी इंदूरमध्ये स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. यानंतर त्यांना बॉम्बे रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. भय्यूजी महाराजांच्या मृत्यूनंतर आता राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. भाजपा नेत्यांच्या मानसिक दबावामुळे भय्यूजी महाराजांनी आत्महत्या केल्याचा सनसनाटी आरोप काँग्रेस नेते माणिक अग्रवाल यांनी केला आहे. 'भय्यूजी महाराजांनी भाजपासाठी काम करावं, यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात होता. त्यामुळे ते मानसिक तणावाखाली होते. ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेता भय्यूजी महाराजांच्या आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हायला हवी. त्यामुळे सत्य काय ते बाहेर येईल,' असं काँग्रेस नेते माणिक अग्रवाल यांनी इंडिया टुडे या वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं. भय्यूजी महाराजांच्या आत्महत्येनंतर राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. 'भय्यूजी महाराजांच्या मृत्यूची बातमी ऐकून दु:ख झालं. माझे त्यांच्याशी अतिशय चांगले संबंध होते. त्यामुळे त्यांच्या निधनानं मला धक्का बसला आहे,' असं केंद्रीय मंत्री नितन गडकरींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. मध्य प्रदेशमधील शिवराज सिंह सरकारनं त्यांना काही दिवसांपूर्वीच राज्यमंत्रीचा दर्जा दिला होता. मात्र त्यांनी हा दर्जा नाकारला होता. अनेक दिग्गज राजकीय नेते त्यांचे भक्त होते. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांचा समावेश होता. अनेक राजकीय समेट घडवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. 

टॅग्स :Bhayyuji Maharajभय्यूजी महाराजSuicideआत्महत्याPoliticsराजकारणNitin Gadkariनितीन गडकरीUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारRaj Thackerayराज ठाकरेBJPभाजपाcongressकाँग्रेसCBIगुन्हा अन्वेषण विभागNarendra Modiनरेंद्र मोदीPratibha Devisingh Patilप्रतिभा देवीसिंग पाटील