शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

आई-बहिणीवरून शिव्या देत राडेबाजांसारखे तुटून पडले, भास्कर जाधव यांनी सांगितला अध्यक्षांच्या दालनातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 12:12 IST

संस्कार, संस्कृती, सभ्यतेला काळे फासले गेले. एवढी लांच्छनास्पद घटना यापूर्वी घडलेली नव्हती.

मुंबई : विरोधी पक्षनेते लालबुंद होऊनच अध्यक्षांच्या दालनात आले. सभागृहात बोलण्याची संधी दिली नाही म्हणून ते माझ्यावर रागावलेले होते. मी त्यांच्याशी बोलतच होतो, तेवढ्यात या बाजूचे (भाजप) काही आमदार आत घुसले, त्यांनी मला अश्लील शिवीगाळ केली. राडेबाजांसारखे ते तुटून पडले, अशा शब्दांत तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी घटनाक्रम सांगितला. त्यावेळी सत्तापक्षाने ‘शेम शेम’च्या घोषणा दिल्या.आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वांत काळा दिवस आहे. महाराष्ट्राला काळिमा फासणारा प्रकार आज घडला. संस्कार, संस्कृती, सभ्यतेला काळे फासले गेले. एवढी लांच्छनास्पद घटना यापूर्वी घडलेली नव्हती. मी कोणालाही शिवी दिली नाही. एक साधा असंसदीय शब्द जरी मी वापरला असेल तर तुम्ही ते सिद्ध करा, सीसीटीव्ही फुटेज तपासा, तसे काही आढळले तर तुम्हाला होईल तीच शिक्षा मी स्वत:साठी घेईन, हे सांगताना भास्कर जाधव भावुक झाले.जाधव म्हणाले, कोणी मला म्हटले की तुम्ही निघून जा; पण मी एक पाऊलही मागे जाणार नाही, पळून तर जाणारच नाही. मी त्यातला नाही. मात्र, आज तालिका अध्यक्ष या नात्याने माझ्याबाबत जे घडले ते लांच्छनास्पद होते. लोकशाहीच्या मंदिरात गुंडशाही व्हायला लागली तर हे सगळे कुठे जाईल, असेही जाधव म्हणाले.

मी रोखठोक आहे. कधीही खोटे बोललेलो नाही. त्याची किंमतही मी मोजली. व्यक्तिगत कटुता कुणाबद्दल ठेवली नाही. आजही फडणवीस, चंद्रकांत पाटील हे अध्यक्षांच्या दालनात आले तेव्हा मी त्यांना सन्मानाने बसण्यास सांगितले. मात्र, तेवढ्यात काही भाजप आमदार आले आणि त्यांनी मला आई-बहिणीवरून शिव्या देणे सुरू केले.- भास्कर जाधव, तालिका अध्यक्ष

टॅग्स :Bhaskar Jadhavभास्कर जाधवVidhan Bhavanविधान भवनvidhan sabhaविधानसभाBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस