भारत गौरव ट्रेन आजपासून घडविणार छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची सफर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार शुभारंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 08:15 IST2025-06-09T08:11:51+5:302025-06-09T08:15:23+5:30

Bharat Gaurav Train: महाराष्ट्र शासन, भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळाने आपल्या ऐतिहासिक वारशास उजाळा देण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनगौरवाचा अनुभव देण्यासाठी एक विशेष पर्यटक ट्रेन ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ची घोषणा केली आहे.

Bharat Gaurav Train will recreate the journey of Chhatrapati Shivaji's valour from today | भारत गौरव ट्रेन आजपासून घडविणार छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची सफर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार शुभारंभ

भारत गौरव ट्रेन आजपासून घडविणार छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची सफर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार शुभारंभ

मुंबई - महाराष्ट्र शासन, भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळाने आपल्या ऐतिहासिक वारशास उजाळा देण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनगौरवाचा अनुभव देण्यासाठी एक विशेष पर्यटक ट्रेन ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ची घोषणा केली आहे. या अंतर्गत भारत गौरव टुरिस्ट ट्रेन सोमवार ९ जूनपासून सुरू होत आहे.
सोमवारी सकाळी ६ वा. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १८ येथे या ट्रेनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिरवा झेंडा दाखवतील. 

पाच दिवसांची विशेष टूर
महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभाग व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या सहभागाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेजस्वी इतिहासाची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक स्थळांना व्यापक प्रसिद्धी मिळवून देण्याचा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा आणि शासनाचा  मानस आहे.

या ५ दिवसांच्या विशेष टूरमध्ये रेल्वे स्थानकांपासून ते महाराजांच्या गडकिल्ल्यांपर्यंत, प्रत्येक ठिकाणी इतिहासाच्या पाऊलखुणांचा वेध घेत, पर्यटकांना पर्यटनाचा आनंद घेता येईल असे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई आणि राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी सांगितले.

कुठे होणार पर्यटन?
रायगड किल्ला : छत्रपती शिवाजी महाराज 
यांचा राज्याभिषेक येथे झाला व ही राजधानी होती.
लाल महाल, पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपण येथे गेले.
कसबा गणपती व शिवसृष्टी, पुणे : पुण्याचे ग्रामदैवत व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील संग्रहालय
शिवनेरी किल्ला : छत्रपती शिवाजी महाराज 
यांचे जन्मस्थळ
भीमाशंकर : १२ ज्योतिर्लिंग पैकी एक प्रमुख धार्मिक स्थळ
प्रतापगड : अफझल खानावरील ऐतिहासिक विजयाचे ठिकाण
कोल्हापूर : महालक्ष्मी मंदिर
पन्हाळा : बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्याचे प्रतीक

Web Title: Bharat Gaurav Train will recreate the journey of Chhatrapati Shivaji's valour from today