शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत भारत बंदचा परिणाम; स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी अडवली ट्रेन, 24 पक्षांचा बंदला पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 10:20 IST

पोलिसांनी आंदोलन करत्यांना ट्रॅकवरून हटवले आणि ताब्यात घेतले. (Bharat Bandh)

नवी दिल्ली - केंद्रसरकारने आणलेल्या कृषी कायद्याला विरोध करत आज शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली आहे. या बंदनुसार, सकाळी 11 वाज्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत चक्का जाम करण्यात येणार आहे. देशातील जवळपास दोन डझन राजकीय पक्षांनी या बंदला पाठींबा दर्शवला आहे. याशिवाय अनेक संघटनाही शेतकऱ्यांच्या बाजुने उभ्या ठाकल्या आहेत. आजच्या भारत बंदमुळे अनेक ठिकाणच्या दळणवळणावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातही भारतबंदचा परिणाम, रेल्वे अडवली - आजच्या भारतबंदला महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही पाठिंबा दिला आहे. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे रेल्वे अडवली होती. यानंतर पोलिसांनी आंदोलन करत्यांना ट्रॅकवरून हटवले आणि ताब्यात घेतले.

पुण्यातील APMC मार्केट खुले, ट्रेडर्स म्हणाले - शेतकऱ्यांना समर्थन -आमच्या शेतरी आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. मात्र, आज आम्ही बाजारपेठ सुरूच ठेवणार आहोत. जेणेकरून इतर राज्यांतून येणारा शेतकऱ्यांचा माल साठता यावा अन्यथा तो कुजेल. तो उद्या विकला जाईल, असे स्थानिक व्यापारी सचिन पायगुडे यांनी म्हटले आहे. 

वेगवेगळ्या राज्यांत कडेकोट सुरक्षा व्यवस्था -शेतकऱ्यांच्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर वेवगेळ्या राज्यात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. बिहारमध्ये कडेकोट सुरक्षा आहे. एवढेच नाही, तर कायदा आणि सुव्यवस्थेचे उल्लंघण करणाऱ्यांवर कारवाईचे आदेशही देण्यात आले आहेत. दिल्ली येथील सिंधू सीमेवरही बंदच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर पोलीस आणि सुरक्षा रक्षकांना तैनात करण्यात आले आहे. 

याशिवाय देशातील अनेक राज्यांत वेगवेगळे राजकीय पक्ष या बंदला पाठिंबा दर्शवत रस्त्यावर उतरले आहेत. ओडिशातही भारत बंदच्या समर्थनार्थ डाव्या पक्षांनी भुवनेश्वर येथे रेल्वे अडवल्या. तसेच भारत बंदमध्ये तृणमूल काँग्रेसचा सहभाग नाही, मात्र, शेतकरी आंदोलनास आमचा पाठिंबा आहे, असे ममत बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

तेलंगणातील बस चालक-वाहक शेतकऱ्यांच्या समर्थनात -कामारेड्डी येथील रस्ते परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनीही शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. एका बसचालकाने म्हटले आहे, "मुख्यमंत्र्यांनी कृषी कायद्यांविरोधात आवाज उठविला. त्यांना पाठिंबा देत, आम्ही आरटीसीचे कामगार येथे आंदोलन करत आहोत. शेतकर्‍यांवर अन्याय होऊ नये."शेतकऱ्यांच्या भारत बंदला कर्नाटकातील काँग्रेस नेत्यांचाही पाठिंबा -शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारतबंदला कर्नाटकातील काँग्रेस नेतांनीही पाठींबा दर्शवला आहे. एवढेच नाही, तर या नेत्यांनी केंद्राविरोधात घोषणाबाजीही केली आणि बेंगळुरूतील विधान सौधा येथील गांधी पुतळ्यासमोर काळे झेंडेही दाखविले. यावेळी पक्षाचे नेते सिद्धरामैय्या, बीके हरिप्रसाद, रामलिंग रेड्डी आदी उपस्थित होते.

या पक्षांचा भारतबंदला पाठिंबा -1.काँग्रेस2.माकपा3.डीएमके4.सीपीआई5.राजद6. एनसीपी7.जेएमएम8.सपा 9. शिवसेना10.अकाली दल11.भाकपा-माले12. गुपकार गठबंधन13.टीएमसी14.टीआरएस15.एआयएमआयएम16. आम आदमी पार्टी17. पीडब्ल्यूपी18. बीवीए19. आरएसपी20. एफबी21. एसयूसीआय (सी)22. स्वराज इंडिया23.जेडीएस24. बसपा

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपBharat Bandhभारत बंदRaju Shettyराजू शेट्टीMaharashtraमहाराष्ट्रrailwayरेल्वे