शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
3
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
4
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
5
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
6
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
7
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
8
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
9
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
10
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
11
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
12
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
13
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
14
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
15
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
16
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
17
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
18
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
19
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
20
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले

भंडारा अग्निकांडातील मृत बालकांची ओळख न पटवताच मृतदेह पालकांच्या हवाली, शोकाकुल जन्मदात्यांची क्रूर थट्टा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2021 5:55 PM

Bhandara Fire Updates : अग्निकांडात होरपळलेल्या ‘त्या’ मृत जीवांची तत्परतेने ओळख पटविण्याचा चमत्कार करून भंडारा रुग्णालयाच्या प्रशासनाने मृत बालकांचे जन्मदाते, त्यांचे आप्तस्वकियच नव्हे तर उभ्या जगाचीही रडकी बोळवण केली.

- नरेश डोंगरे 

नागपूर - ते जगात आले असले तरी त्यांना जगाची ओळख नव्हती. जग काय, जिने जन्माला घातले तिलाही त्यांनी निट बघितलं नव्हतं. तर, ९ महिने पोटात सांभाळणाऱ्या माऊलीनही त्याला-तिला नीट बघितलं नव्हतं. त्यामुळे त्याचा-तिचा गोड चेहरा जन्मदात्रीलाही व्यवस्थीत आठवत नसावा. काजव्याप्रमाणे तो निरागस जीव काही वेळ लुकलुकला अन् आगीत लुप्तही झाला. नियतीने १० जन्मदात्यांवर सूड उगवला तर प्रशासनाने पुढचे पाउल टाकले. डीएनए टेस्ट केलीच नाही अन् धगधगत्या आगीतून अलगद निखारा काढावा, त्याप्रमाणे होरपळलेल्या ‘त्या’ मृत जीवांची तत्परतेने ओळख पटविण्याचा चमत्कार करून भंडारा रुग्णालयाच्या प्रशासनाने मृत बालकांचे जन्मदाते, त्यांचे आप्तस्वकियच नव्हे तर उभ्या जगाचीही रडकी बोळवण केली.

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात केअर युनिटच्या अतिदक्षता विभागात शनिवारी पहाटे २ च्या सुमारास आग लागली. ज्यांना निट हालचालही करता येत नाही, अशा १० निष्पाप, निरागस जीवांना या आगीने भक्ष्य केले. ही आग कशी लागली, कुणाच्या निष्काळजीपणामुळे लागली, हे शोधण्याच्या घोषणा अन् प्रयत्न सुरू झाले आहे. त्यामुळे अग्नीज्वाळा आता काहींच्या नोकऱ्यांना झळ पोहचवू शकतात. ते ध्यानात घेत आपला पदर जळू नये म्हणून संबंधित मंडळी आपापल्या अंगावरचे घोंगडे झटकण्याचे जोरदार प्रयत्न चालविले आहेत. त्यामुळेच की काय संबंधित कोडग्यांनी पीडितांच्या भाव-भावनांनाही रुग्णालयातील आगीच्या हवाली करण्याची निर्लज्ज धावपळ चालविली आहे. ज्या आगीने लोखंडी पट्टयांना पिघळवले त्या आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या कोवळ्या बालकांची अवस्था काय झाली असेल, हे सहज लक्षात यावे. या बालकांची नाजूक नितळ त्वचा त्यांचा चेहरा खरेच शाबूत राहिला असेल का, या प्रश्नाचे उत्तर अपवादानाचे कुणाकडून ‘हो’ मिळेल. १० पैकी एक दोन बालकांच्या बाबतीत तसे झालेही असेल. मात्र, १० पैकी ९ बालकांचे (एक बिचारा बेवारस म्हणून सापडला होता अन् त्याची प्रकृती चांगली नसल्याने त्याला येथे दाखल केला होता.) कलेवर संबंधित डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी आग विझल्यानंतर लगेच पीडित परिवारांच्या पदरात घातले. हे तुमचेच आहे, असे म्हणत त्या शोकविव्हळ परिवारांना स्मशानाच्या वाटेने लावले. बाळ जन्माला आल्याचा आनंद गगनात मावेनासा झाल्याची आैटघटकेची भावना अन् नंतर काळीज चिरणारे दुख पदरात घेऊन पदरात पडलेल्या मृत जीवाला घेऊन निघालेल्या पीडितांना हे बाळ आपलेच की दुसऱ्याचे ते विचारण्याचे भान असण्याचे कारण नाही. मात्र, ते बाळ त्यांचेच हे संबंधित डॉक्टर, पारिचारिका आणि ईतर कर्मचाऱ्यांनी एवढ्या लवकर कसे काय ठरवले, हा लाखमोलाचा प्रश्न ठरतो.

 कशी पटवली लगेच ओळख?

आगीने होरपळलेल्या आणि धुराने काळवंडलेल्या मृत बालकांची ओळख तेथील संबंधितांनी झटपट कशी पटवली, हा सामान्य नागरिक नव्हे तर वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींनाही खटकणारा प्रश्न आहे. प्रसृती तज्ज्ञ, नवजात शिशू तज्ज्ञ आणि त्वचा तज्ज्ञांच्या मते आईने जन्माला घातल्यानंतर पहिले दोन आठवडे शिशू सगळ्यापासूनच बेखबर असतो. चार आठवड्यापासून तो प्रतिसाद देणे सुरू करतो. हसनं, आईकडे बघणं , टकटकी लावणं, आकार घेण त्याच आपल सुरू होते. ६ आठवड्यांपर्यंत त्याची त्वचा एवढी कोमल असते की गरम वाफेचाही त्याला धोका होऊ शकतो. अशात रुग्णालयाच्या आगीत ज्या १० नवजात बालकांचा बळी गेला, त्यांची आगीनंतर लगेच ओळख पटणे अशक्यच आहे. या संदर्भात बोलताना सुप्रसिद्ध जेनेटिसिस्ट डॉ. विनय टुले म्हणाले की, एक नव्हे १० बालकांचे प्राण गेले. घटनास्थळी गोंधळ उडाला असेल यात शंकाच नाही. त्यामुळे मृतांची अदलाबदली होण्याचा धोका आहे. अशात मातापित्यांच्या हवाली मृतदेह करण्यापूर्वी डीएनए टेस्ट करायला हवी होती. धावपळ, गडबड अन् ...

प्रत्यक्षदर्शींच्या मते पहाटे दोनच्या वेळी जेव्हा आग लागली तेव्हा सर्वच जण साखर झोपेत होते. थंडीचे दिवस असल्याने आगीकडे बराच वेळ कुणाचे लक्ष गेले नाही. नंतर मात्र एकच धावपळ उडाली. निरागस बालक असलेल्या आणि आग लागलेल्या कक्षासमोर खुपच गोंधळ आरडाओरड सुरू झाली होती. आग विझवल्यानंतर घाईगडबडीतच सर्व बालकांना एसएनसीयूतून बाहेर काढण्यात आले. १० जणांचा मृत्यू झाला होता. हादरलेले, गोंधळलेले भंडारा प्रशासन निस्तरण्यासाठी कामी लागले होते. मृत बालकांचे काही नाव नव्हतेच. गळालेल्या त्वचेला साफ करून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी पीडितांना हाक दिली अन् तो निष्प्राण जीव त्यांच्या पदरात घातला. संबंधित प्रशासनाने या घिसाडघाईतून काय साध्य करण्याचा किंवा दडवण्याचा प्रयत्न केला, हे काही दिवसांनी पुढे येईल. पण मृताची अदलाबदल झाली असेल तर...?

टॅग्स :Bhandara Fireभंडारा आगMaharashtraमहाराष्ट्र