आम्हाला मरण आले तरी बेहत्तर...; एकनाथ शिंदेंनी सांगितले बंडखोरीचे आणखी एक कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2022 22:23 IST2022-06-26T22:16:40+5:302022-06-26T22:23:22+5:30

एकनाथ शिंदे यांनी काही वेळापूर्वीच दोन ट्विट करत शिवसेना नेत्यांवर कठोर शब्दांत टीका केली आहे.

Better if we die ...; Eknath Shinde is aggressive by mentioning Dawood, Nawab malik, Says thats the reason of Shivsena rebel Mlas | आम्हाला मरण आले तरी बेहत्तर...; एकनाथ शिंदेंनी सांगितले बंडखोरीचे आणखी एक कारण

आम्हाला मरण आले तरी बेहत्तर...; एकनाथ शिंदेंनी सांगितले बंडखोरीचे आणखी एक कारण

शिवसेनेच्या आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेले राजकीय वादळ आता मृत्यू, बळी देण्याच्या भाषेवर उतरले आहे. संजय राऊतांनी शिवसेनेच्या ४० आमदारांचा बळी द्या, असे वक्तव्य केलेले असताना शिंदे गटाने त्यांच्यावरील निलंबनाच्या कारवाईविरोधात सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. 

असे असताना एकनाथ शिंदे यांनी काही वेळापूर्वीच दोन ट्विट करत शिवसेना नेत्यांवर कठोर शब्दांत टीका केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांसाठी आणि बाळासाहेबांची शिवसेना वाचविण्यासाठी आम्हाला मरण जरी आलं तरी बेहत्तर, तसे झाल्यास आम्ही सारे आमचं भाग्य समजू, अशा शब्दांत शिंदे यांनी पहिले ट्विट केले आहे. 

यानंतर शिंदे यांनी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि दाऊद गँग यांच्याशी संबंधीत ट्विट केले आहे. मुंबई बाँबस्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना समर्थन कशी करू शकते…? यालाच आम्ही विरोध करत हे पाऊल उचलले आहे. आम्हा सर्वांना मृत्यूच्या दारात घेऊन गेले तरी चालेल, अशा शब्दांत आपण मरण्यासाठी तयार असल्याचे ट्विट शिंदे यांनी केले आहे. 


 

Web Title: Better if we die ...; Eknath Shinde is aggressive by mentioning Dawood, Nawab malik, Says thats the reason of Shivsena rebel Mlas