शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

ऐन पावसात ‘बेस्ट’ आधार

By admin | Updated: June 22, 2015 02:59 IST

मुंबई शहर आणि उपनगरात सलग तीन दिवस कोसळणाऱ्या पावसादरम्यान लोकलचा बिघाड झाल्याने पर्यायी वाहतूक व्यवस्था असलेल्या बेस्ट बसने

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात सलग तीन दिवस कोसळणाऱ्या पावसादरम्यान लोकलचा बिघाड झाल्याने पर्यायी वाहतूक व्यवस्था असलेल्या बेस्ट बसने मुंबईकर चाकरमान्यांना आधार दिला. लांब पल्ल्यांच्या बेस्ट बसने चाकरमान्यांची पायपीटही वाचली.शुक्रवारी सुरु झालेल्या पावसाची संततधार तिसऱ्या दिवशीही कायम असून, शुक्रवारच्या पावसाने तर मुंबई ठप्प केली होती. मुंबईची लोकल बंद पडल्याने मुंबईकरांच्या वाटा बंद झाल्या होत्या. परंतु यावर उपाय म्हणून बेस्ट प्रशासनाने अतिरिक्त बेस्ट गाड्या रस्त्यावर उतरविल्या. मात्र सखल भागांत पाणी साचल्याने मुंबईची रस्ते वाहतूकही बंद पडली होती. त्यावरही उपाय म्हणून प्रशासनाने बेस्ट बसचे मार्ग वळवित प्रवाशांना आधार दिला होता. विशेषत: लाल बहादूर शास्त्री मार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, पूर्व-पश्चिम द्रुतगती मार्गावर पावसादरम्यान धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या बेस्ट बसने प्रवाशांना दिलासा देण्याचे काम केले. लाल बहादूर शास्त्री मार्गावर धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या उशीराने धावत असल्या तरी प्रवाशांना किमान सायनपर्यंत पोहचविण्यात बेस्ट बसने मोलाची भूमिका बजावली होती.रविवारी पावसाचा जोर ओसरला असला आणि लोकलही वेळेत धावत असल्या तरी आवश्यकता भासल्यास अतिरिक्त गाड्यांचा ताफा तैनात असल्याचे बेस्ट समितीचे अध्यक्ष अरुण दुधवडकर यांनी सांगितले.