शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Municipal Election 2026 Live: २९ मनपा निवडणुकीचे मतदान सुरू, मोहन भागवतांनी बजावला मतदानाचा हक्क
2
आज साडेतीन कोटी मतदारांचा दिवस,'महा'मतदान करू, 'योग्य' सेवक निवडू; २,८६९ जागांसाठी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
3
आजचे राशीभविष्य, १५ जानेवारी २०२६: अचानक धनलाभ, अलौकिक अनुभूती; मान-सन्मानाचा दिवस
4
दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा आज 'ईव्हीएम' बंद होणार; मुंबईत ठाकरे बंधू की भाजप-शिंदे याचा फैसला
5
शिंदेसेनेच्या दोन उमेदवारांना रुग्णालयातच अटक केल्यावरून उडाला गोंधळ, भाजपने केली होती मागणी
6
मतदारांनो, घरबसल्याच शोधा मतदार यादीमध्ये नाव! निवडणूक आयोगाचे पोर्टल, मोबाइलवर सुविधा
7
उन्हाचा तडाखा अन् उकाडा... मतदानाला सकाळीच पडा बाहेर, मुंबईकर घामाघूम होण्याची शक्यता
8
मुंबईत मतमोजणीत अडचण आली तरच करणार 'पाडू' यंत्राचा वापर; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
9
ट्रम्प यांच्या टॅरिफवर आज कोणताही निर्णय नाही, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी दुसऱ्यांदा पुढे ढकलली
10
Daryl Mitchell च्या शतकासह यंगची 'विल पॉवर'! टीम इंडियावर पलटवार करत न्यूझीलंडनं साधला बरोबरीचा डाव
11
इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
12
Daryl Mitchell Hundred : डॅरिल मिचेलची कडक सेंच्युरी; किंग कोहलीच 'नंबर वन' स्थान धोक्यात!
13
अमेरिकेने केली इराणची कोंडी, चारही बाजूंनी घेरले; 'या' देशांमध्ये लष्करी तळ...
14
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
15
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
16
शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
17
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
18
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
19
लहानपणीची गोंडस मुलगी आता झालीये सुपरहॉट, रेड बॅकलेस ड्रेसमध्ये सारा अर्जुनचा किलर लूक!
20
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

मराठा समाजाच्या मागणीनुसारच ‘ईडब्ल्यूएस’च्या आरक्षणाचा लाभ - अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2020 06:39 IST

Ashok Chavan : चव्हाण म्हणाले, मराठा समाजाला ईडब्ल्यूएसचे लाभ देण्यात यावेत. याबाबत राज्य मंत्रिमंडळानेसुद्धा निर्णय घेतला होता. परंतु समाजात यावर एकमत नव्हते. काही नेत्यांनी या निर्णयाला विरोध केल्यामुळे तो तात्पुरता स्थगित केला होता.

मुंबई :  सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशामुळे तूर्तास मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीवर प्रतिबंध आल्यानंतर एसईबीसी आरक्षणाचा लाभ मिळत नसेल तर  नुकसान कमी करण्यासाठी मराठा समाजाला ईडब्ल्यूएसचे लाभ देण्यात यावेत, अशी अनेकांनी मागणी केली होती. त्यानुसारच एसईबीसी प्रवर्गाला ऐच्छिक स्वरूपात ईडब्ल्यूएसचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री व मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.   चव्हाण म्हणाले, मराठा समाजाला ईडब्ल्यूएसचे लाभ देण्यात यावेत. याबाबत राज्य मंत्रिमंडळानेसुद्धा निर्णय घेतला होता. परंतु समाजात यावर एकमत नव्हते. काही नेत्यांनी या निर्णयाला विरोध केल्यामुळे तो तात्पुरता स्थगित केला होता. परंतु दरम्यानच्या काळात अनेक विद्यार्थी उच्च न्यायालयात गेले. एसईबीसी आरक्षणावर तूर्तास प्रतिबंध असल्याने आम्हाला ईडब्ल्यूएसचे लाभ देण्यात यावेत, अशा १०-१२ याचिका उच्च न्यायालयात दाखल झाल्या होत्या. त्यावर मुंबई उच्च न्यायालय व औरंगाबाद खंडपीठाने मराठा समाजातील संबंधित विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले होते. राज्य सरकारने यासंदर्भात भूमिका निश्चित करावी, असेही न्यायालयाने सांगितले होते. एसईबीसी आरक्षणाचा लाभ मिळत नसल्यास कायद्याने मराठा समाजातील विद्यार्थ्यांना किंवा उमेदवारांना ईडब्ल्यूएसच्या लाभापासून वंचित ठेवता येणार नाही. पैसे खर्च करून सर्व विद्यार्थी उच्च न्यायालयात जाऊन ही सवलत मिळविणे शक्य नाही. या पार्श्वभूमीवर संबंधित लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु काही मंडळी यावर राजकारण करीत आहेत, असे चव्हाण यांनी सांगितले. 

मराठा समाजातील सर्व जण १० टक्क्यांत किती बसतात याचा अभ्यास करावा, किती टक्के आरक्षण मिळणार आहे याचाही अभ्यास करावा. ‘एसईबीसी’चे स्वतंत्र आरक्षण होते आणि हे आरक्षण पूर्ण वेगळे. मराठा समाजाने ५८ मोर्चे काढले. ४८ लोकांनी बलिदान दिले. १९६७ पासून लढा दिला. अण्णासाहेब पाटील यांनी आत्महत्या केली. हे सगळे व्यर्थ जाणार आहे का? याचे उत्तर सरकारने द्यावे.- खासदार छत्रपती संभाजीराजे

ईडब्लूएसचे आरक्षण लागू करण्याच्या राज्य सरकारच्या भूमिकेचे स्वागत आहे. ते लागू करावे, यासाठी मी पहिल्यापासून आग्रह धरत आलो. सरकारला उशिरा शहाणपण सुचले. आता प्रवेशासाठी आरक्षणाचा लाभ, नोकऱ्यांत संधी मिळवून देण्याची जबाबदारी सरकारची आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी माझे यासंबंधी बोलणे सुरू आहे.- प्रवीण गायकवाड, संभाजी ब्रिगेड

ईडब्लूएस आरक्षण देऊन समाजासाठी खूप काहीतरी केलेय अशा आविर्भावात न राहता शासनाने मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यावर लक्ष केंद्रित करावे आणि न्याय मिळवून द्यावा. - विनोद पाटील, याचिकाकर्ते

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणMaratha Reservationमराठा आरक्षण