शहरं
Join us  
Trending Stories
1
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
2
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
3
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? UAE विरुद्ध खेळणार नसल्याची मोठी माहिती आली समोर
4
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
5
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
6
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
7
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
8
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
9
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
10
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
11
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
12
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
13
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
14
"बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्..."; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला
15
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
16
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?
17
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
18
टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण?
19
World Athletics Championships 2025 : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक; इथंही IND vs PAK महामुकाबला?
20
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र

रस्त्यावरील अपघातात द्या माणुसकीचा हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 20:16 IST

रस्त्यावर एखाद्याचा अपघात झाल्यास त्या जखमी व्यक्तीला मदत करण्याऐवजी नागरिक बघ्याची भूमिका घेताना दिसतात...

ठळक मुद्देसुप्रीम कोर्टाच्या तत्वांनुसार स्वत:चे नाव व पत्ता पोलिसांनी सांगणे बंधनकारक नाही.

पुणे :  रस्त्यावर एखाद्याचा अपघात झाल्यास त्या जखमी व्यक्तीला मदत करण्याऐवजी नागरिक बघ्याची भूमिका घेताना दिसतात. याचे महत्वाचे कारण म्हणजे अशा व्यक्तींना वाटणारी कोर्ट कचे-यांची व पोलिसांकडून दिल्या जाणा-या त्रासाची भीती. त्या अपघातग्रस्त व्यक्तीला जर वेळीच उपचार मिळाले तर त्याचे प्राण नक्कीच वाचू शकतात. यासाठी महाराष्ट्र आथोर्पेडिक असोसिएशन (एमओए) तर्फे 28 एप्रिल ते 5 मे दरम्यान '' रस्त्यावरील अपघातात द्या माणुसकीचा हात'' या शीर्षकाखाली विविध ठिकाणी जागरूकता प्रशि़क्षण उपक्रम राबिवले जाणार आहेत. महाराष्ट्र अथोर्पेडिक डे निमित्त हे उपक्रम प्रि-हॉस्पिटल ट्रॉमा केअर (अपघातग्रस्त व्यक्तीला रूग्णालयात दाखल करेपर्यंत घ्यावयाची काळजी) आणि नागरिकांचा सहभाग यावर केंद्रित करण्यात आले असल्याची माहिती  एमओए चे माजी अध्यक्ष डॉ.पराग संचेती, एमओए चे सदस्य डॉ.चंद्रशेखर साठ्ये,सदस्य डॉ.गोवर्धन इंगळे आणि पीओएसचे सचिव डॉ.संजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.एखाद्याचा दुदेर्वाने जर कुठे अपघात झाला तर आजही लोक मदतीचा हात पुढे करायला धास्तावतात. पण हा भीतीचा दृष्टीकोन काढून टाकणे गरजेचे आहे. अपघात झालेल्या व्यक्तीला हॉस्पिटलला दाखल करण्यापूर्वी मदत करून कशी काळजी घ्यावी याची माहिती आठवडाभर चालणा-या या उपक्रमांद्वारे दिली जाणार आहे. लोकांनी अशा प्रसंगी अधिक संवेदनशीलतेने मदतीचा हात पुढे करावा हे या उपक्रमांमागचा हेतू आहे. या उपक्रमांमध्ये शैक्षणिक कार्यक्रम,शिबिरे,पथनाट्य व चित्रफितींचा समावेश असेल.डॅ.पराग संचेती म्हणाले, रस्त्यावरील अपघातात जमलेल्या गर्दीपैकी बघ्या व्यक्तींनी नुसतेच बघत न राहाता जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा अपघातग्रस्त व्यक्तीला मदत केली पाहिजे. मात्र त्यासाठी अशा घटनांच्या वेळी सर्वप्रथम कोणती कृती करायला पाहिजे याची माहिती असणे गरजेचे आहे. अपघातग्रस्त व्यक्तीच्या मदतीसाठी पुढाकार घेणा-या व्यक्तीलाच केसमध्ये अडकविण्याची भीती असते त्यामुळे सामान्य व्यक्ती मदतीसाठी पुढे येत नाहीत. सुप्रीम कोर्टाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार अपघातग्रस्त व्यक्तीला मदत करण्यासाठी धावून जाणा-या व्यक्तीला ( गुड समरिटान) स्वत:चे नाव व पत्ता पोलिसांनी सांगणे बंधनकारक नाही. पोलीस अशा गुड समरिटानला अपघाताचा साक्षीदार बनण्याची सक्ती करू शकत नाही. तसेच त्याचा जबाब घेण्यासाठी त्याला पोलीस स्टेशनमध्ये बोलावू शकत नाहीत. त्यामुळे रस्त्यावर अपघात झालेल्या व्यक्तीच्या मदतीसाठी थांबा. तुमच्या मदतीने कुणाचे तरी प्राण वाचू शकणार आहेत. यासाठी हा जनजागृती उपक्रम हाती घेण्यात आला आहे.............*अपघातग्रस्त व्यक्तीचा श्वास चालू आहे याची खात्री करून घ्या. श्वासातून घरघर येत असेल तर अशा व्यक्तीचा खालचा जबडा ( हनुवटी) हाताच्या बोटांनी उचल्यास श्वासमार्ग मोकळा होण्यास मदत होते.बेशुद्ध व्यक्तीत जीभेचा मागचा भाग घशामध्ये पडून- अडकून श्वासमार्ग बंद पडतो त्यामुळे ती व्यक्ती अपघातातील जखमांमुळे मृत्यू न पावता श्वास बंद पडल्यामुळे मृत्यू पावते. * अपघातग्रस्त व्यक्तीच्या शरीरातून होणारा रक्तस्त्राव थांबवा. कधीकधी अपघातात अति रक्तस्त्रावामुळे व्यक्तीचा मृत्यू  होऊ शकतो. अपघात स्थळी रक्तस्त्राव थांबण्यासाठी जखमेवर हाताने दबाव द्या अथवा जखमेभोवती घट्ट फडके किंवा बँडेज गुंडाळा. या दोन सोप्या कृतीने जखमेतून होणारा रक्तस्त्राव थांबू शकतो. * अपघातग्रस्त व्यक्तीचे हात/पाय मोडले असतील व वेडेवाकडे झाले असतील तर त्यांना आधार द्या. अशा फँक्चर झालेल्या हातापायांना रूग्णाला फार न दुखावता जेवढे जमेल तेवढे सरळ करा व त्यांना सहज उपलब्ध कडक वस्तुंचा ( कार्डबोर्ड, काठ्या, छत्री) आधार द्या. * जखमी व्यक्ती जर श्वास घेत असेल पण प्रतिसाद देत नसेल ( शुद्धधीवर नसेल) तर अशा व्यक्तीला कुशीवर झोपवा. कुशीवर झोपवल्यास अशा व्यक्तीचा श्वासमार्ग मोकळा राहातो. 

अपघात घडल्यास या क्रमांकावर संपर्क साधापोलीस (100)अँम्ब्युलन्स ( 108)एकात्मिक आपत्कालीन ( 112) 

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातPoliceपोलिसSupreme Courtसर्वोच्च न्यायालय