शहरं
Join us  
Trending Stories
1
'मिस्टर राज!' लाव रे तो व्हिडीओवर राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचे प्रत्यूत्तर; किनी हत्याकांड, कोहिनूर मिलची केली आठवण
2
जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान
3
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२४; एखाद दुसरी सोडली, तर सर्वच राशींना फायद्याचा, आनंदाचा दिवस
4
बाळासाहेबांवर अन्याय करणाऱ्यांना सोबत कसे घेतले? राज ठाकरे, ठाण्यातील लोंढ्यांबाबत चिंता
5
पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल
6
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका
7
मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका
8
ही लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी झालेली आहे: प्रकाश आंबेडकर
9
“यापुढे विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, राजकीय संन्यास…”: एकनाथ खडसे
10
भाजपाने उद्योग, नोकऱ्या गुजरातला पळविल्या, उद्या मंत्रालयही पाठवले जाईल: आदित्य ठाकरे
11
सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे रामाला विरोध करणाऱ्यांबरोबर; पुष्करसिंह धामी यांची टीका
12
४ जूनला भाजपा जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येईल: शशी थरूर, देशभरात हवा बदलल्याचा दावा
13
मुंबईत प्रचाराचा सुपरसंडे! मतदानाआधीचा शेवटचा रविवार; सभांमुळे वातावरण तापले
14
चौथ्या टप्प्यातही नात्यांची कसोटी; विखे, गावित, खडसे, मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला
15
पोट भरण्याचे अन् विजेचे वांदे; महागाईविरोधात ‘पीओके’ पेटले
16
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
17
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
18
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
19
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
20
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?

"मोहब्बतच्या दुकानातील शटरमागे काँग्रेसच्या करप्शनचे काळेकुट्ट दुकान"

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2023 3:26 PM

'गरीब हटाओ'चे नारे देत, जनतेच्या डोळ्यांत धूळ फेकत, गरिबीचे सोंग आणत कसे  दौलतजादे बनतात काँग्रेसी?

मुंबई - काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधींकडून नेहमीच प्रेमभावना आणि एकतेचा संदेश दिला जातो. भारत जोडो यात्रेतून हा संदेश घेऊन आपण काश्मीर ते कन्याकुमारी पदयात्रा केल्याचं ते म्हणतात. म्हणूनच काँग्रेसकडून त्यांचं उदाहरण देताना, मोहब्बत की दुकान ही टॅगलाईन दिली जाते. आता, याच टॅगलाईनल धरुन भाजपाने काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. काँग्रेस खासदार धीर साहू यांच्याकडे सापडलेल्या गडगंज संपत्तीच्या नोटांवरुन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. 

'गरीब हटाओ'चे नारे देत, जनतेच्या डोळ्यांत धूळ फेकत, गरिबीचे सोंग आणत कसे  दौलतजादे बनतात काँग्रेसी? याचे जितेजागते उदाहरण म्हणजे खासदार धीरज साहू!. आयकर बुडवून बेहिशेबी पैसा इतका दडवून ठेवला की मोजता मोजता मशिन्स बंद पडल्या. जनतेला सांगायचे 'धीरज रखो, भला होगा' आणि स्वतः गरिबांच्या पैशावर डोळा ठेवून गब्बर व्हायचे. गरिबांच्या योजनांसाठी वापरला करोडो रुपयांचा आयकर बुडवायचा हाच या मद्यसम्राटाचा धंदा!. भ्रष्टाचाराने बरबटलेले काँग्रेस राजवटीतील गरिबांचे लुटारू आता जनतेला पुराव्यासह दिसू लागले, असे म्हणत बावनकुळे यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. 

मोहोब्बतच्या दुकानाच्या शटरमागे गरिबांना लुटणारे काँग्रेसचे असे 'करप्शनचे काळीकुट्ट दुकान' आहे, असे म्हणत त्यांनी राहुल गांधींवरच टीका केली आहे. 

२२५ कोटींची बेहिशोबी मालमत्ता

आयकर विभागाने झारखंड आणि ओडिशातील अनेक ठिकाणी मद्य उत्पादक कंपनीविरुद्धच्या करचुकवेगिरीप्रकरणी छापेमारी केली. आज शनिवारी चौथ्या दिवशीही ही छापेमारी सुरूच आहे. याप्रकरणात आयकर अधिकाऱ्यांनी आत्तापर्यंत रोख भरलेल्या १५६ बॅग जप्त केल्या आहेत, ज्यामध्ये २२५ कोटी रुपयांपेक्षा जास्त रोकड सापडली. संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयकर अधिकाऱ्यांचे पथक शनिवारी सकाळी तीन बॅगांसह रांची येथील काँग्रेस राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्या निवासस्थानातून निघाले. धीरज साहू यांच्या घरातून जप्त केलेल्या बॅग या दागिन्यांनी भरल्या होत्या, असे सांगण्यात आले आहे. ही छापेमारी खासदार साहू यांच्याशी निगडीत कंपन्यांवर करण्यात आली आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपाITमाहिती तंत्रज्ञानjharkhand election 2019झारखंड निवडणूक 2019Corruptionभ्रष्टाचार