शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

बियरचा ट्रक उलटला, चालक केबिनमध्ये अडकला, मदतीऐवजी बाटल्या लुटण्यासाठी लोक तुटून पडले    

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 12:12 IST

Accident News: एखाद्या वाहनाला अपघात झाल्यानंतर मदतीसाठी धाव घेणाऱ्यांचं प्रमाण आपल्याकडे फारच कमी आहे. त्यात एखाद्या मालवाहू वाहनाला अपघात झाल्यास मदत करण्यापेक्षा आतील मालाची लुटालूट करणाऱ्यांची संख्याच अधिक दिसते. असाच एक धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज परिसरात घडलेल्या अपघातानंतर दिसून आला.

एखाद्या वाहनाला अपघात झाल्यानंतर मदतीसाठी धाव घेणाऱ्यांचं प्रमाण आपल्याकडे फारच कमी आहे. त्यात एखाद्या मालवाहू वाहनाला अपघात झाल्यास मदत करण्यापेक्षा आतील मालाची लुटालूट करणाऱ्यांची संख्याच अधिक दिसते. असाच एक धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज परिसरात घडलेल्या अपघातानंतर दिसून आला. येथील रांजणगाव रोडवर एका व्यक्तीला वाचवण्याच्या प्रयत्नात बियरने भरलेला ट्रक उलटला. अपघातानंतर ड्रायव्हर ट्रकच्या केबिनमध्ये अडकला, तर ट्रकमधील बियरच्या बाटल्या रस्त्यावर विखुरल्या गेल्या. मात्र या ड्रायव्हरची सुटका न करता लोक रस्त्यावर विखुरलेल्या बियरच्या बाटल्या गोळा करण्यासाठी तुटून पडले.

रांजणगाव रोडवर बियरने भरलेला ट्रक उलटल्यानंतर केबिनमध्ये अडकलेला चालक मदतीसाठी विनवणी करत होता. मात्र या चालकाकडे दुर्लक्ष करत लोकांनी रस्त्यावर विखुरलेले बियरच्या बाटल्यांनी भरलेले बॉक्स आणि बाटल्या लुटण्यास सुरुवात केली. बघता बघता ही माहिती सगळीकडे पसरली आणि बाटल्या लुटण्यासाठी लोकांची अधिकच गर्दी झाली. त्यामुळे अपघातग्रस्त ट्रकजवळ काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं.

या अपघाताची माहिती काही लोकांनी त्वरित पोलिसांना दिली. त्यानंतर वाळूज पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जमावाला पांगवले. पोलिसांनी जखमी ट्रकचालकाला ट्रकमधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दरम्यान, अशा प्रकारचा अपघात झाल्यानंतर रस्त्यावर गोंधळाचं वातावरण निर्माण करणारे लोक स्वत:ही अडचणीत सापडू शकतात. कुठल्याही अपघातानंतर लुटालुटीला नाही तर जखमी व्यक्तींचं संरक्षण आणि मदतीला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे, असं आवाहन पोलिसांनी केलं.  

English
हिंदी सारांश
Web Title : Beer truck overturns; people loot bottles instead of helping driver.

Web Summary : A beer truck overturned near Sambhajinagar, trapping the driver. Instead of helping, people looted beer. Police dispersed the crowd and rescued the driver, emphasizing helping victims over looting.
टॅग्स :Accidentअपघातchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरMaharashtraमहाराष्ट्र