बीड सेक्स रॅकेट, विवाहितेला विकणारे मामा-भाचे गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 04:24 IST2017-10-02T04:24:12+5:302017-10-02T04:24:19+5:30
पश्चिम बंगालच्या अल्पवयीन विवाहितेला बीडमध्ये विकणाºया नराधम मामा-भाच्याच्या शिवाजीनगर पोलिसांनी शनिवारी रात्री ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील घरातून मुसक्या आवळल्या.

बीड सेक्स रॅकेट, विवाहितेला विकणारे मामा-भाचे गजाआड
बीड : पश्चिम बंगालच्या अल्पवयीन विवाहितेला बीडमध्ये विकणाºया नराधम मामा-भाच्याच्या शिवाजीनगर पोलिसांनी शनिवारी रात्री ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील घरातून मुसक्या आवळल्या. तजमुल शेख आणि त्याचा मामा युनूस शेख अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पश्चिम बंगालमधून कामासाठी मुंबईला आलेल्या जोडप्याला एका ७० वर्षीय अंकलसह तजमूल अकमल शेख यांनी जाळ्यात ओढले होते. पती वांद्रे येथे काम पाहण्यासाठी गेल्याचा फायदा घेत तजमुलने त्याच्या अल्पवयीन पत्नीला बीडला आणून सविता व शशिकला आंटीला वेश्याव्यवसायासाठी विकले होते. पोलिसांनी धाड टाकून या दोन्ही आँटींना ताब्यात घेत विवाहितेची सुटका केली होती. त्या तीन दिवसांत ४० लोकांनी अत्याचार केल्याचा जबाब पीडितेने पोलिसांना दिला होता. युनूस व तजमुल हे आधी कल्याणमधील उल्हासनगर भागात राहत होते. गुन्हा दाखल झाल्याचे समजताच ते घर बदलून बदलापूर भागात राहण्यास गेले होते. पोलिसांनी पत्ता शोधून काढला व तीन दिवस पाळत ठेवून बदलापूर भागातील भाड्याच्या घरातून अटक केली़
मामाच्या खात्यावर आंटीकडून पैसे जमा
तजमुल हा आंटीकडे मुली पाठवायचा. त्यानंतर आंटी ही युनूस शेखच्या बँक खात्यावर पैसे पाठवीत असे. आतापर्यंत यामध्ये त्यांनी किती मुलींना विकले व किती पैसे कमावले, हे तपासातून उघडकीस येणार आहे.