धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार?; अजित पवार CM देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 21:41 IST2025-01-06T21:40:45+5:302025-01-06T21:41:36+5:30

मुंडे अजितदादा भेटीनंतर संध्याकाळी धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहावर जात भेट घेतली होती. 

Beed Sarpanch Santosh Deshmukh murder case - Ajit Pawar meets CM Devendra Fadnavis, opposition demands Dhananjay Munde resignation | धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार?; अजित पवार CM देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला

धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार?; अजित पवार CM देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला

मुंबई - बीड सरपंच हत्याकांड प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. त्यात आज मंत्री धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची आज भेट घेतली. बीड प्रकरणात धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. मंत्रालयात दुपारी झालेल्या या भेटीनंतर रात्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सागर बंगल्यावर जात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या दबावावर या भेटीत काय चर्चा होणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मुंडे यांच्या जवळचे लोक अडकले आहेत. त्यामुळे या प्रकरणी त्यांचा हस्तक्षेप होऊ शकतो. सरकार हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करतंय असा आरोप विरोधकांकडून केला जात आहेत. भाजपा आमदार सुरेश धस यांनी थेट अजित पवार धनंजय मुंडे यांना पाठीशी घालतायेत असा आरोप केला. मुंडे अजितदादा भेटीनंतर संध्याकाळी धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहावर जात भेट घेतली. त्यानंतर रात्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात अर्धा तास चर्चा झाली आहे.  

धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला पाहिजे

आम्ही धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. १०० टक्के दादा त्यांना पाठीशी घालतायेत. अजितदादा राजीनामा घेतील असं मला वाटत नाही. राजीनामा घ्यावा की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. अजित पवारांनी राजीनामा घेतला पाहिजे आणि धनंजय मुंडेनेही राजीनामा दिला पाहिजे ही माझी प्रामाणिक मागणी आहे. जोपर्यंत तपास सुरू आहे तोपर्यंत तुम्ही पदावरून बाजूला जावं. त्या पदावर चिटकून का राहता..स्वत:हून राजीनामा द्यायला हवा. धनंजय मुंडेंचे नुकसान होणार नाही तर अजित पवारांचे होणार असं सुरेश धस यांनी म्हटलं आहे. 

तर बीड विषयावर कसलीही चर्चा अजित पवारांसोबत झाली नाही. कुणी काय आरोप करावेत, हे लोकशाहीला प्रत्येकाला अधिकार दिलेले आहेत. मी कोणा-कोणाचे तोंड धरणार आहे? माझं म्हणणं आहे की, जे आरोप करताहेत, ते ज्या पक्षाचे आहेत. त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांना आपण हा प्रश्न विचारावा. ते महायुतीत भाजपाचे आमदार असतील, तर त्यांनी सुद्धा त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांना आणि मुख्यमंत्र्यांना विचारावं" असा पलटवार धनंजय मुंडे यांनी सुरेश धस यांच्यावर नाव न घेता केला आहे. 

Web Title: Beed Sarpanch Santosh Deshmukh murder case - Ajit Pawar meets CM Devendra Fadnavis, opposition demands Dhananjay Munde resignation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.