मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 15:48 IST2025-09-25T15:47:57+5:302025-09-25T15:48:23+5:30
बीड जिल्ह्यात एकीकडे अजित पवार पूरग्रस्त पाहणी दौऱ्यावर आहेत. तर दुसरीकडे धनंजय मुंडे देखील परळी मतदारसंघात पूरग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर आहेत. यावेळी धनंजय मुंडे यांच्यासमोर आपली व्यथा मांडताना महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले.

मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
वाल्मिक कराड प्रकरणामुळे मंत्रिपदापासून, राजकारणापासून काहीसे दूर असलेले राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी बीडमधील पुरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी एका शेतकरी महिलेने मुलीचे लग्न दिवाळीत आहे, कसे करणार, असे सांगत डोळ्यांतून अश्रू काढले. यावर धनंजय मुंडे यांनी तुमच्या मुलीच्या लग्नाची जबाबदारी माझी, मी सगळा खर्च करेन आणि ठरलेल्या वेळेत तिचे लग्न लावून देईन, असे आश्वासन दिले.
बीड जिल्ह्यात एकीकडे अजित पवार पूरग्रस्त पाहणी दौऱ्यावर आहेत. तर दुसरीकडे धनंजय मुंडे देखील परळी मतदारसंघात पूरग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर आहेत. यावेळी धनंजय मुंडे यांच्यासमोर आपली व्यथा मांडताना महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले.
परळी तालुक्यातील तेलसमुख, बोरखेड, ममदापूर आदी गावांमधील अतिवृष्टी नुकसान व पुरपरिस्थितीची मुंडे आज पाहणी करत आहेत. दरम्यान, तेलसमुख येथील एका शेतातील कापसाच्या उभ्या पिकाचे पावसाने नुकसान केले आहे. या शेतकऱ्याच्या मुलीचे दिवाळीत लग्न ठरले आहे. परंतू, या अस्मानी संकटामुळे हे लग्न कसे करावे असा प्रश्न या कुटुंबासमोर होता. धनंजय मुंडेंसमोर या महिला शेतकऱ्याने आपली व्यथा मांडली.
यावेळी मुंडे यांनी शेतीच्या नुकसानीसाठी शासन आपली मदत करेल. पण मुलीच्या लग्नाची काळजी करू नका. ठरलेल्या वेळीच लग्न होईल, या लग्नाच्या संपूर्ण खर्चाची जबाबदारी मी घेतो, असे सांगत आधार दिला.