शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

"मागासवर्गीय असल्यानेच छगन भुजबळांबद्दल खालच्या पातळीवरची भाषा वापरली जातेय", नाना पटोलेंचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2024 06:09 IST

Chhagan Bhujbal:

मुंबई - राज्यातील ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांच्याबद्दल ज्या पद्धतीने अत्यंत खालच्या पातळीवरची भाषा वापरण्यात आली, त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री असलेले भुजबळ हे मागासवर्गीय समाजाचे आहेत म्हणूनच त्यांच्याबद्दल शिविगाळ करणारी भाषा वापरण्यात आली आहे, ही मानसिकता भारतीय जनता पक्षाची आहे. भुजबळांबद्दल जी भाषा वापरली त्याबद्दल सरकारने माफी मागावी आणि हिम्मत असेल तर सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाडांना तातडीने निलंबित करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे-भाजपा-पवार सरकारवर तोफ डागली, ते म्हणाले की, सरकार राज्यात जाणीवपूर्वक ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद निर्माण करत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाच मराठा अध्यादेशाला विरोध असून ते कोर्टात जाण्याची भाषा करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात हा काय तमाशा चालवला आहे? भाजपाने महाराष्ट्राचे मोठे नुकसान केले आहे यातून महाराष्ट्राला वाचवण्यासाठी आमची लढाई सुरु आहे.

महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरही उपस्थित होते, त्यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. चर्चेत आंबेडकर यांनी काही मुद्दे मांडले आहेत, त्यांचे व आमचे अनेक मुद्दे समान आहेत यातूनच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्याचा निर्णय झाला असून किमान समान कार्यक्रम ठरवला जाईल, या समितीत सर्व घटक पक्षांच्या सदस्यांचा समावेश असेल. आठ दिवसात ही समिती अहवाल सादर करेल व त्यानंतर पुढील आठवड्यात मविआच्या बैठकीत जागा वाटपावरही चर्चा होईल. जागा वाटपावर महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत, सर्व ४८ जागा मविआ लढणार असून सर्वात जास्त जागांवर मविआचा विजय होईल, असा दावाही पटोले यांनी केला. 

 एका प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, इंडिया आघाडीत बिहारमध्ये जे घडले ते सर्वांना माहित आहे, नितीशकुमार यांनी यापूर्वीही असा दलबदल केला आहे. बिहारमध्ये काँग्रेस व लालू प्रसाद यादव यांच्या राजद पक्षाची मोठी ताकद आहे म्हणूनच भाजपाचे दोन कार्यकर्ते ईडी व सीबीआयकडून त्यांच्यावर दबाव आणला जात आहे परंतु भाजपाला याचे परिणाम भोगावे लागतील, असेही नाना पटोले.

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळNana Patoleनाना पटोलेSanjay Gaikwadसंजय गायकवाडMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार