सावध व्हा :आठवड्याला येतात १८ नवे 'स्कॅम', मल्टिलेव्हल मार्केटिंगच्या नावे ३० हजार कोटींचा ‘फ्रॉड’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 07:13 IST2025-01-20T07:12:23+5:302025-01-20T07:13:40+5:30

Scams News: मल्टिलेव्हल मार्केटिंगच्या नावाने गुंतवणूक करण्याच्या आणि मेंबर बनविण्याच्या १७ ते १८ अधिक स्कॅम दर आठवड्याला भारतात लाँच होत आहेत. त्याद्वारे लाखो लोकांना बळीचा बकरा बनविले जाते.

Be careful: 18 new 'scams' appear every week, 'fraud' worth Rs 30,000 crore in the name of multi-level marketing | सावध व्हा :आठवड्याला येतात १८ नवे 'स्कॅम', मल्टिलेव्हल मार्केटिंगच्या नावे ३० हजार कोटींचा ‘फ्रॉड’

सावध व्हा :आठवड्याला येतात १८ नवे 'स्कॅम', मल्टिलेव्हल मार्केटिंगच्या नावे ३० हजार कोटींचा ‘फ्रॉड’

- पवन देशपांडे 
मुंबई - मल्टिलेव्हल मार्केटिंगच्या नावाने गुंतवणूक करण्याच्या आणि मेंबर बनविण्याच्या १७ ते १८ अधिक स्कॅम दर आठवड्याला भारतात लाँच होत आहेत. त्याद्वारे लाखो लोकांना बळीचा बकरा बनविले जाते. त्यात कोट्यवधींचे नुकसान झाल्यानंतर पश्चाताप होतो. देशात अशा प्रकारे उघड न झालेल्या आणि काही प्रमाणात तपास सुरू असलेल्या जवळपास ३० हजार कोटींच्या फसव्या योजना कार्यरत असल्याचे समोर आले आहे. 

२००७ पासून भारतात स्थापन झालेल्या १४,००० हून अधिक एमएलएम अर्थात मल्टिलेव्हल मार्केटिंग योजनांच्या माहितीचे स्ट्रॅटेजी इंडिया या संस्थेने संकलन आणि विश्लेषण केले. त्यानंतर ४ हजारांहून अधिक योजना फसव्या असल्याचे उघडकीस आले असून, त्यांचे अलर्ट या संस्थेने जारी केले होते. त्यातून फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. यामुळे आम्हाला बेकायदेशीर, फसवणुकीच्या योजना ओळखणे शक्य झाले आहे, असे संस्थेने म्हटले आहे. नुकत्याच मुंबईत उघडकीस आलेल्या टोरेस घोटाळ्यासह गेन बिटकॉइन, आयएक्स ग्लोबल अशा योजना संस्थेच्या ‘स्कॅम अलर्ट लिस्ट’मध्ये बऱ्याच काळापूर्वीच समाविष्ट होत्या.

कधी आणि किती आले स्कॅम?
२०१८    २७९
२०१९    ३८७
२०२०    ३२६
२०२१    ३७२
२०२२    २८५
२०२३    ४२१
२०२४    ४३३

एखादी योजना ‘स्कॅम’ आहे हे कसे ओळखावे?
स्ट्रॅटेजी इंडियाचे प्रमुख  प्रांजल आर. डॅनियल यांना सांगितले की, एखादी योजना ‘स्कॅम’ आहे हे ओळखण्यासाठी प्रत्येकाने त्या योजनेतील काही माहिती तपासून बघणे गरजेचे आहे. स्कॅममध्ये अडकण्याआधी आणि आर्थिक नुकसान होण्याआधी विचार करा. 

उत्पन्न मिळवण्यासाठी सदस्यांकडून फार कमी किंवा कोणतेही प्रयत्न अपेक्षित नाहीत, असे दाखविले जाते.
नोंदणीसाठी किंवा सहभागी होण्यासाठी शुल्क आकारले जाते.
सदस्यत्वासाठी शुल्क आकारले जाते.
क्रिप्टो करन्सी, एनएफटी स्वरूपात गुंतवणूक, ठेवी मागितल्या जातात.
स्वतःच्या क्रिप्टो करन्सी खरेदी करण्यास गळ घातली जाते.
प्रॉडक्ट विक्रीच्या तुलनेत सदस्य भरतीस प्राधान्य व प्रोत्साहन दिले जाते.
थर्ड पार्टी नावाने नोंदणीकृत बँक खात्यात ठेवी मागविल्या जातात.
परदेशी बँक खात्यात (परकीय चलनात) ठेवी मागितल्या जातात. 

घोटाळ्यात अडकलेले काही पीडित व्यक्ती (रुपये)
विद्या सुनील पाटोळे     १.५७ कोटी
नयना सुनील चौधरी     १.२६ कोटी
प्रदीप एम.एस.      १ कोटी 
आनंदसिंग गिरासे     ८३.९१ लाख
दीपक कोंडिबा गवाडे      ८२.८८ लाख
मनोज गजानन वाळके      ८०.२६ लाख
विजय कोंडिभाऊ कणसे      ६३.२० लाख
सत्यनारायण पडवाल      ५४.७० लाख
संतोष पाटील       ५०.१२ लाख
संकेत तांडेल     ४४.४० लाख
हिमांशू जैन     ४३.२४ लाख
निशा इनामदार     ३५.१५ लाख

Web Title: Be careful: 18 new 'scams' appear every week, 'fraud' worth Rs 30,000 crore in the name of multi-level marketing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.