शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

ही लढाई कोरोनाविरुद्धची नव्हे निसर्ग विरोधातील...: डॉ. मोहन आगाशे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 5:28 PM

सद्यस्थितीत 'कोरोना' ला कसं हरवायचं नि मनुष्याच्या शरीरातून या विषाणूला कसं नष्ट करायचं यामागे मनुष्यजात लागली आहे..

ठळक मुद्देज्येष्ठ मानसोपचारतज्ञ डॉ. मोहन आगाशे यांची कोरोनाविषयीची वैचारिक, चिंतनशील मांडणी..

नम्रता फडणीस-    पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून निसर्ग आपल्याला निरनिराळ्या प्रकारे संकेत देण्याचा प्रयत्न करत आहे. भूकंप, त्सुनामी,महापूर येत आहे. पावसाचं चक्र उलटसुलट झालं आहे. पण आपण त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहोत. अखेर निसर्गाने त्याचा मार्ग शोधला आहे. आपण सतत निसर्गाच्या विरोधात जात आहोत. आपण त्याचाच एक भाग आहोत हे विसरलो आहोत. त्यामुळे ही लढाई कोरोनाविरुद्धची नव्हे तर निसर्गविरोधातील आहे, अशा वैचारिक, चिंतनशील मांडणीतून ज्येष्ठ मानसोपचारतज्ञ डॉ. मोहन आगाशे यांनी ' मानवाला सूचित केले आहे.     सद्यस्थितीत 'कोरोना' ला कसं हरवायचं नि मनुष्याच्या शरीरातून या विषाणूला कसं नष्ट करायचं यामागे मनुष्यजात लागली आहे.  रात्रंदिवस कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी वॉरियर्स जीवाचे रान करीत आहेत. पण ही लढाई आत्ताची नाही असे डॉ. मोहन आगाशे यांनी ' लोकमत' शी बोलताना सांगितले.   ते म्हणाले, वर्तमान जगताना भूत आणि भविष्याचा संदर्भ असावा लागतो. जसं एखाद्या चित्राला पार्श्वभूमी असल्याशिवाय ते उठून दिसत नाही. तशीच माणसाच्या आयुष्याला पार्श्वभूमी लागते. जे काही घडले आणि घडणार आहे त्याचा अभ्यास केला पाहिजे. आपण आणि निसर्ग वेगळे नाही. आपण एकच आहोत. पण निसर्ग आपल्यापेक्षा मोठा आहे. आपण त्याचाच एक भाग आहोत. आपण जिथे आहोत तिथून जग सुरू होते असा विचार जेव्हा सुरू झाला. तेव्हा खरी पंचाईत झाली. पूर्वी वैद्यकशास्त्रात रुग्ण आला की माणूस बघायचे, आजार बघायचे नाहीत, माणसा प्रमाणे औषध दिले जायचे. पण आज आधी आजार बघून मग मनुष्याला औषध दिले जात आहे.आपला व्यवसाय हा कधी धंदा झाला हे कळले देखील नाही. पण पैशाने मिळणाऱ्या  गोष्टी या निव्वळ भौतिक आहेत. ही सगळी एक निसर्गलॉजी आहे.    निसर्ग म्हणजे एकमेकांशी असलेलं नात आहे. सजीव, निर्जीव ची एक समज उमज असावी लागते. मात्र आज बुद्धीची वाढ संवेदनापेक्षा जलद गतीने झाली आहे. नात टिकविण्यासाठी बुद्धी नि संवेदना दोन्हींची गरज लागते. मग ते नात निसर्गाच का असेना? निसर्गाचा एक घटक हा ' माणूस' आहे. पण माणसाच्या बुद्धीचा वापर वेगळ्याच कारणासाठी होत आहे.  ' प्रगती' या  नावाखाली माणूस म्हणून एक वेगळंच रूप धारण केलं आहे.आपण निसर्गाच्या विरोधात जात आहोत.    आपण आपल्या हाताने निसर्गाचे संतुलन बिघडवलं आहे. त्यामुळे आज मानवजातच त्याला बळी पडते आहे. पण निसर्ग आपल्यालाही आपलंच मानतो. तो फक्त त्याचं बिघडलेलं तंत्र दुरुस्त करतो आहे. तो आपल्याला सांगू बघतो आहे की मायक्रोस्कोपखालीही सहज न दिसू शकणार हा व्हायरस तुला नष्ट करू शकतो. तर  थोडासा नतमस्तक हो. तू माझाच भाग आहेस हे मी विसरलो नाहीये, तू ही विसरू नकोस. याकडे लक्ष वेधण्याचा डॉ आगाशे यांनी प्रयत्न केला आहे..........आपण लोकांचं आयुर्मान वाढवतोय     आपण मेडिकल सायन्स, टेक्नॉलॉजी ह्या सगळ्याचा आधारे माणसाचं आयुर्मान वाढवत आहोत. शरीराचे अवयव हे प्रत्यारोपित करत आहोत आणि निसर्गाचे संतुलन बिघडवत आहोत. नैसर्गिकरित्या जन्म- मृत्यू होऊच देत नाहीयोत. जन्म-मृत्यू ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. निसर्ग कायम आपलं संतुलन जपण्याच्या प्रयत्नात असतो. एक विषाणू आपण नष्ट केला तर तोच रूप बदलून पुन्हा येतो. आपण सतत निसर्गाच्या विरोधात जात आहोत असे डॉ आगाशे यांनी सूचित करण्याचा प्रयत्न केला आहे.......

टॅग्स :PuneपुणेMohan Agasheमोहन आगाशेNatureनिसर्गenvironmentपर्यावरणcorona virusकोरोना वायरस बातम्या