शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

सीमावासीयांची लढाई मतांची नव्हे, तर मातीची- धनंजय मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 01:19 IST

महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे बेळगाव येथे मराठी भाषिकांचा महामेळावा

बेळगाव : ‘तुमचं आमचं नातं रक्ताचं आहे, महाराष्ट्राचं आहे. बेळगाव सीमावासीय गेल्या साठ वर्षांपासून महाराष्ट्रात येण्यासाठी लढा देत आहेत, आपल्या लढाईला माझा मानाचा मुजरा आहे. बेळगावसह संयुक्त महाराष्ट्राची लढाई मतांची नाही तर मातीची आहे.’ असे प्रतिपादन महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सोमवारी केले. बेळगाव येथील टिळकवाडी येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने कर्नाटक विधीमंडळ अधिवेशन विरोधात आयोजित महामेळाव्यात ते बोलत होते.धनंजय मुंडे म्हणाले, कर्नाटक सरकारला अधिकृत दौरा कळवून इथं आलो, त्यांनी प्रोटोकॉल पाळायला नकार दिला, पण मी इथे प्रोटोकॉलसाठी नाही तर माझ्या महाराष्ट्रातील मराठी बांधवांसाठी इथे आलो आहे. महाराष्ट्राची १२ कोटी जनता तुमच्या सोबत आहे. माझ्या नेत्यांनी म्हणजे शरद पवार यांनी या लढाईत पाठीवर काठी खाल्ली आहे; मी तुम्हाला शब्द देतो की जीवात जीव असेपर्यंत मी तुमच्या हक्कासाठी लढत राहीन. अन्यायी कर्नाटक सरकारला नक्की आपल्या लढ्यापुढे झुकावेच लागेल.बेळगावप्रश्नी मी त्वरित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. त्यांना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी भाग पाडू’ असे म्हणत धनंजय मुंडे यांनी ही लढाई आता तरुणांनी हाती घ्यावी, असे आवाहन केले. या मेळाव्यास एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, माजी आमदार मनोहर किणेकर, अरविंद पाटील, मालोजी अष्टेकर, शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विजय देवणे, प्रकाश मरगाळे, राजाभाऊ पाटील, उपमहापौर मधुश्री पुजारी आदी उपस्थित होते.मेळाव्यासाठी मुंडे मध्यरात्रीच बेळगावातधनंजय मुंडे यांनी कर्नाटक सरकारचा प्रोटोकॉल न घेता रविवारी मध्यरात्रीच बेळगाव गाठले होते. पोलिसांचा विरोध झुगारत त्यांनी टिळकवाडी येथील मेळावास्थळी प्रवेश केला. त्यावेळी ‘बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ अशा घोषणांनी सारा परिसर दणाणून सोडला होता. मेळावा ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कर्नाटक पोलिसांची दडपशाही झुगारून मराठी भाषकांनी मेळावा यशस्वी करून दाखविला.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेbelgaonबेळगावMaharashtraमहाराष्ट्र