शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

कालबाह्य कायद्याचा नगरविकासात अडसर

By admin | Updated: March 16, 2015 02:32 IST

नगर परिषदांच्या समित्यांचे आर्थिक अधिकार वाढवण्यासाठी शासनाने २०१२ साली कायद्यात बदल केला़ त्याचवेळी आर्थिक अधिकार वेळोवेळी वाढवण्याचे

प्रमोद आहेर, शिर्डीनगर परिषदांच्या समित्यांचे आर्थिक अधिकार वाढवण्यासाठी शासनाने २०१२ साली कायद्यात बदल केला़ त्याचवेळी आर्थिक अधिकार वेळोवेळी वाढवण्याचे अधिकारही स्वत:कडे घेतले़ मात्र अद्यापही शासनाने हे अधिकार वापरले नाहीत व नगर परिषदांना पूर्वीचेही अधिकार राहिले नसल्याने कायदेशीर पेच निर्माण झाला आहे़कायद्यातील बदलानंतर घेतलेले आर्थिक निर्णय कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे़ १९६५च्या कायद्याने अस्तित्वात आलेल्या नगर परिषदांना स्वत:चे अधिकार देण्याकरिता १९९३च्या ७४व्या घटना दुरुस्तीपर्यंत कोणतेही प्रयत्न झाले नाहीत़ या घटना दुरुस्तीने नगर परिषदांना स्वत:चे अस्तित्व व नागरी जीवनात आमूलाग्र बदलाची संधी मिळाली़विकासाला चालना मिळण्याची चिन्हे दिसत असतानाच खुल्या अर्थव्यवस्थेने शहरीकरणाला वेग मिळाला. परंतु त्या तुलनेत नगर परिषदांची क्षमता न वाढल्याने शहरांना समस्यांची कीड लागली़ आता या समस्यांनी उग्र रूप धारण केल्याने नगर परिषदा मूलभूत समस्या हाताळण्यात अपयशी ठरताहेत़ त्याच्या मुळाशी अधिकार, उत्पन्न व प्रशासनाच्या समस्या आहेत़ब्रिटिश काळातील कायद्यांवर बनवण्यात आलेल्या १९६५च्या कायद्यात अद्यापही कायदेकारी व कार्यकारी अंगे केंद्र व राज्याप्रमाणे वेगवेगळी नाहीत़ त्यामुळे निर्णय प्रक्रियेत लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप असतो़ त्यामुळे शासनाची धोरणे मतदारांवर विपरीत परिणाम करणारी असल्यास त्याची अंमलबजावणी करणे प्रशासनास अवघड होते़ उदाहरणार्थ चतुर्थवार्षिक आकारणी, घरपट्टी व पाणीपट्टीतील वाढ, अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण निष्कासन आदी विषयांकडे बघता येईल.बीओटीचे धोरण विकासाला लाभप्रद ठरत असताना त्यासाठीचे प्रस्ताव वर्षानुवर्षे शासकीय मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याने नगर परिषदांच्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम होतो़ याकरिता हे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर द्यायला हवेत़ मुख्य म्हणजे महानगरपालिकांचे कायदे नगर परिषदांना लागू होणे गरजेचे आहे़