बारामती : कोरोना नियंत्रणात न आल्यास कडक निर्बंधांचा विचार - अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2021 02:56 PM2021-04-04T14:56:51+5:302021-04-04T14:58:52+5:30

मास्क परिधान न करणारे, गर्दी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचेही आदेश

Baramati Thought of strict restrictions if Coronavirus is not under control says deouty cm Ajit Pawar | बारामती : कोरोना नियंत्रणात न आल्यास कडक निर्बंधांचा विचार - अजित पवार

बारामती : कोरोना नियंत्रणात न आल्यास कडक निर्बंधांचा विचार - अजित पवार

Next
ठळक मुद्देमास्क परिधान न करणारे, गर्दी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचेही आदेशलसीकरणाचाही वेग वाढवण्याचे निर्देश

बारामती : "बारामती  तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, पुढील दिवसात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात न आल्यास कडक निर्बंध लागू करण्याचा विचार करावा लागेल," असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आढावा बैठकीत दिला.  

बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली 'कोरोना विषाणू निर्मूलन आढावा बैठकी’चे आयोजन करण्यात आले होते.  त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे, पंचायत समितीच्या सभापती नीता फरांदे, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, महावितरणचे मुख्य अभियंता सुनिल पावडे यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. "सद्यस्थितीत बारामती तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात न आल्यास कडक निर्बंध लागू करण्याचा, विचार करावा लागेल," असे पवार यावेळी म्हणाले.

"ज्याठिकाणी कोरोनाचे रुग्ण जास्त आहेत त्या ठिकाणी हॉटस्पॉट घोषित करा. ते करतांना नगरसेवकांना विश्वासात घ्या. ग्रामीण भागात सर्वेक्षण करण्यावर भर द्या, पुणे जिल्हा परिषदेने ज्याप्रकारे कोरोना अपडेटसाठी  तयार केले आहे त्याच धर्तीवर बारामती तालुक्यासाठीही ॲप तयार करा. जेणेकरून कोरोनाची सद्यस्थिती आणि बेडची उपलब्धतेबाबत नागरिकांना माहिती मिळणे सुलभ होईल, अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे, नागरिकांपर्यंत पोहचून कोरोनाबाबत जनजागृती करावी, ऑक्सीजन बेडची कमतरता भासणार नाही,  याची दक्षता घ्यावी," असंही ते यावेळी म्हणाले.  

गर्दी करणाऱ्यांवर, मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई

"बारामती शहरात काही नागरिक मास्क वापरताना दिसत नाहीत. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करतांना दिसत नाहीत. बाजाराच्या ठिकाणी गर्दी करत आहेत. यावर प्रशासनाने कडक उपाययोजना करुन दंडात्मक कारवाई करावी.  सार्वजनिक ठिकाणी तसेच अन्यत्र गर्दी होणार नाही आणि सुरक्षित अंतर राखले जाईल, याची सर्वांनीच दक्षता घेणे आवश्यक आहे. लग्नसमारंभ आणि अन्य कार्यक्रमासाठी  नियमानुसार लोकांची संख्या मर्यादित ठेवणे अपेक्षित आहे, याकडे विशेष लक्ष द्यावे. लसीकरणाचा वेग वाढवावा. सॅनिटायझरचा वापर करावा, कोरोनाशी लढण्याकरीता आवश्यक असणाऱ्या वैद्यकीय साधनसामुग्रीची  चांगल्या प्रतीची खरेदी करावी. त्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही,  याचीही प्रशासनाने खबरदारी घ्यावी," असेही ते म्हणाले. ‘कोरोना’ संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी गांभीर्याने काळजी घेण्याची आवश्यकता आहे. सामाजिक अंतर ठेवणे, हात वारंवार धुणे, गर्दी  टाळणे या त्रिसुत्रीवर भर देत नागरीकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केलं.
 

Web Title: Baramati Thought of strict restrictions if Coronavirus is not under control says deouty cm Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.