शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
3
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
4
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
5
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
6
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
8
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
9
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
10
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
11
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
12
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
13
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
14
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
15
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
16
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
17
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
18
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
19
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
20
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...

नणंद-भावजय आमने-सामने, पण खरी लढत काका-पुतण्यातच; द्विधा मनस्थितीत बारामतीकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2024 08:23 IST

शरद पवारांनी २००९ पर्यंत या मतदारसंघाचे नेतृत्व केले. त्यानंतर २००९ पासून आजपर्यंत सुप्रिया सुळे या मतदारसंघाचे  प्रतिनिधित्व करत आहेत.

सचिन कापसे बारामती : मागील ४० वर्षांपासून एकसंधपणे बारामतीचा गड राखणारे पवार कुटुंब पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहे. शरद पवार की अजित पवार अशा द्विधा मनस्थितीत बारामतीकर मतदार अडकला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीमुळे विभागलेली ताकत घेऊन अस्तित्वाची लढाई म्हणून आता लढली जात आहे. 

महायुतीची शक्ती सुनेत्रा पवारांच्या मागे तर महाआघाडीची शक्ती सुप्रिया सुळेंच्या मागे उभी असली, तरी बारामतीकर कुठल्या पवारांच्या मागे जातात, यावर विजयाचे गणित अवलंबून आहे. १९८४ साली शरद पवार पहिल्यांदा बारामतीतून निवडून गेले. त्यानंतर १९९१ साली अजित पवारांना खासदारकीची संधी मिळाली. पण त्यानंतर लगेच घडलेल्या राजकीय घडामोडीमुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. मात्र त्यानंतर शरद पवारांनी २००९ पर्यंत या मतदारसंघाचे नेतृत्व केले. त्यानंतर २००९ पासून आजपर्यंत सुप्रिया सुळे या मतदारसंघाचे  प्रतिनिधित्व करत आहेत.

रणनीती शरद पवारांची शरद पवारांनी इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादीपासून दुरावलेले पृथ्वीराज जाचक, आप्पासाहेब जगदाळे तसेच बारामतीत काकडे, तावरे यांच्याशी जवळीक साधत बेरीज करण्याचा प्रयत्न केला आहे. तर इंदापूरमध्ये सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात सक्रिय असणाऱ्या प्रवीण माने यांना फोडण्यात फडणवीस यशस्वी झाले. 

अजित पवारांचे आव्हान सुप्रिया सुळे २००९ पासून या मतदारसंघाचे नेतृत्व करत आल्या आहेत. त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. सुनेत्रा पवारही काही दिवसांपासून मतदारसंघ पिंजून काढत आहेत. २०१९ पर्यंत अजित पवार सुप्रिया सुळे यांच्यासोबत होते. या वेळी अजित पवारांचेच कडवे आव्हान आहे. 

निवडणुकीतील कळीचे मुद्दे

बारामती तालुक्यात जिरायती भागात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई असल्याचा मुद्दा महत्त्वाचा.  एकेकाळी भोर परिसरामध्ये मोठ उद्योगधंदे होते.  नंतरच्या काळात कारखाने बंद पडल्याने या परिसरामध्ये रोजगाराच्या संधी कमी झाल्या. मतदारसंघातील अनेक भागांत रस्त्यांची दुरवस्था. अनेक भागांत पिण्याच्या पाण्याची समस्या. 

...तर गटातटाचा फटकाविजय शिवतारे यांनी अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली होती. अजित पवारांचे कट्टर विरोधक म्हणून ते ओळखले जातात. मात्र एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करत अजित पवारांशी त्यांचे संबंध ठीक करून दिले.  हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांच्यातही फार सख्य नसल्यामुळे प्रत्यक्ष बूथवर काय होईल, याबाबत साशंकता आहे. 

एकूण मतदार    २३,६२,४०७

१२,३६,५०७ -पुरुष 

११,२५,७८४- महिला 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारbaramati-pcबारामतीSupriya Suleसुप्रिया सुळेSunetra Pawarसुनेत्रा पवारlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४