अमेरिकेपाठोपाठ रशियात देखील बारामतीच्या निवडणुकीची चर्चा; शरद पवारांच्या मंचावर 'गोरा'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 10:25 PM2024-06-19T22:25:15+5:302024-06-19T22:31:38+5:30

बारामतीत विविध सभांमधील गोरागोमट्या परदेशी युवकाने वेधले लक्ष; शरद पवार यांनी दिली माहिती

Baramati elections are being discussed in Russia after America; Sharad pawar Said... | अमेरिकेपाठोपाठ रशियात देखील बारामतीच्या निवडणुकीची चर्चा; शरद पवारांच्या मंचावर 'गोरा'

अमेरिकेपाठोपाठ रशियात देखील बारामतीच्या निवडणुकीची चर्चा; शरद पवारांच्या मंचावर 'गोरा'

लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : बारामतीची लोकसभा निवडणुक देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवर लक्षवेधी ठरली. ५५ वर्षांच्या राजकारणात पवार यांनी नेहमीच महत्वाची भुमिका बजावली.देशातील महत्वाच्या नेत्यांमध्ये देखील पवार यांचा उल्लेख होतो.राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष आणि पवार कुटुंबात फुट पडल्यानंतर बारामतीच्या नव्या राजकीय पर्वाला सुरवात झाली.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची खासदार सुप्रिया सुळे यांच्या  विरोधात लढत जाहीर झाल्यानंतर बारामतीची निवडणुक अधिक लक्षवेधी ठरली.

बारामतीत संपुर्ण देशातील माध्यम प्रतिनिधींनी तळ ठोकला.यात आंतरराष्ट्रीय माध्यमांचे प्रतिनिधी देखील अपवाद नव्हते.खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचार सभेच्या शुभारंभालाच अमेरीकेतील न्यूयाॅर्क टाइम्स चे प्रतिनिधी उपस`थित होते.सुळे यांच्यासह पवार यांनी देखील अमेरीकेतील माध्यम प्रतिनिधींचे स्वागत केले.मात्र, निकालानंतर देखील आंतरराष्ट्रीय पातळीवर बारामतीचे राजकारणाचे आैत्सुक्य कायम असल्याचे बुधवारी (दि १९) स्पष्ट केले.आज सांगवीपासून विविध ठीकाणी झालेल्या जनसंवाद यात्रेत्र हा तरुण देखील  राष्ट्रवादीच्या सभेला उपस`थित होता.गोरागोमटा आणि स`थिर नजरेने निरीक्षण करणार तरुण सर्वांच्या औत्सुक्याचा विषय ठरला.

सभेत सर्वंाच्याच नजरा त्याच्यावर खिळल्या होत्या.मात्र, सर्वांच्या मनात निर्माण झालेल्या कुतुहलावर पवार यांनी माहिती दिली.सांगवी येथे शरद पवार म्हणाले, आज माझ्याबरोबर रशियाचा पीटर आला आहे.बारामतीच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशासहित जगाचे लक्ष होते. आज माझ्याबरोबर एक रशियावरून मुलगा आलाय त्यांचे नाव पीटर. मी त्यांना विचारलं कशासाठी येताय? ते म्हटले, गावामध्ये तुमच्या निवडणुका झाल्या त्याची काय पद्धत असते? हे मला पाहायचे आहे. रशियात सुद्धा बारामतीच्या निवडणुकीची चर्चा झाली आणि म्हणून ते स्वतः इथे रशियावरून आले आहेत. बारामतीच्या लोकांनी इतिहास निर्माण केला, असे म्हणत त्यांनी बारामतीकरांचे आभार मानून रशियाच्या तरुणाच्या उपस्थितीची माहिती  दिली.

Web Title: Baramati elections are being discussed in Russia after America; Sharad pawar Said...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.