शहरं
Join us  
Trending Stories
1
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
2
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
3
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
4
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
5
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
6
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
7
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
8
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
9
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
10
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
11
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
12
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
13
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
14
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
15
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
18
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
19
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
20
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

बँक, महसूल खात्याच्या अनास्थेचा शेतक-यांना फटका

By admin | Updated: March 30, 2015 02:16 IST

विदर्भात खरीप हंगामात दुष्काळी स्थिती निर्माण झाल्यानंतर सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात दिला. मात्र शेतकऱ्यांच्या एनपीए खात्यांचे पुनरुज्जीवन

विदर्भात खरीप हंगामात दुष्काळी स्थिती निर्माण झाल्यानंतर सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात दिला. मात्र शेतकऱ्यांच्या एनपीए खात्यांचे पुनरुज्जीवन किंवा नवीन खाते उघडण्यात बँकेची उदासीनता आणि महसूल खात्याकडून शेतकऱ्यांपर्यंत मदतीसंदर्भात व्यवस्थित माहिती न पोहोचल्याने कोट्यवधींचा निधी शासनाकडे परत गेल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच वेळी गोंदियामध्ये शेतकऱ्यांना १०० टक्के मदत वाटप केल्याचा दावा करण्यात आला आहे.नागपूर जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे खाते नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत असल्याने आणि ही बँक डबघाईस आल्याने सुरुवातीला ही रक्कम वाटपात अडचणी निर्माण झाल्या़. अनेकांना या बँकेच्या शाखेतून रक्कम मिळण्यासाठी कसरत करावी लागली. प्रशासनाने शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडण्याची सूचना केली. मात्र मार्च महिना अखेरमुळे राष्ट्रीयीकृत बँकांनी नवीन खाते उघडण्यात रस दाखविला नाही. ज्यांनी राष्ट्रीयीकृत बँकेचे खाते क्रमांक नियोजित वेळेत दिले, त्यांच्याच खात्यात ही रक्कम जमा करण्यात आली. परिणामी नागपूरचे १०१.५८ कोटी रुपये शासनाकडे परत पाठविण्यात आले़ शासनाने २२१.२८ कोटी रुपये मंजूर केले होते. त्यापैकी ११९.७० कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले. अमरावतीमध्ये २५१ कोटी ६३ लाखांपैकी २२१ कोटी ४८ लाख १६ हजारांचा निधी ३ लाख ७५ हजार १४ शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्यक्ष जमा झाला. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार किमान २५ ते २६ हजार शेतकऱ्यांनी तलाठ्यांकडे बँक खाते नंबर दिलेले नाहीत व जे दिले ते चुकीचे असल्याने सुमारे १० कोटींचा निधी परत गेला़ चंद्रपूरला १७० कोटी ६ लाख रुपये मिळाले. पैकी १०१ कोटी ७४ लाख ५७ हजार रुपये वितरीत करण्यात आले. कार्यालयीन खर्चापोटी ४ कोटी २७ लाख ५ हजार ७६२ रुपये खर्च करण्यात आले. काही शेतकऱ्यांनी बँक खाते क्रमांक दिला नाही, तर एकच सातबारामध्ये अनेकांची नावे असल्याने त्या शेतकऱ्यांना या मदतीपासून वंचित राहावे लागले आहे.यवतमाळ जिल्ह्यात २४५ कोटी ६४ लाख रुपयाची शासकीय मदत मिळाली़ चार लाख ४७ हजार ५६ शेतकरी मदतीला पात्र ठरले. शोधूनही त्यांच्यापैकी ४८ हजार शेतकऱ्यांचे बँक खातेच सापडले नाही. त्यामुळे ३० कोटी रुपये शासन जमा झाले. वर्धा जिल्ह्याला या नैसर्गिक आपत्ती मदतनिधीत १०७ कोटी ५३ लाख रुपये प्राप्त झाले. यापैकी ८७ टक्के निधी खर्च झाला आहे. या अंतर्गत दोन लाख शेतकरी पात्र ठरले आहेत. १८ कोटींचा निधी परत गेला आहे.