शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

बँक आॅफ महाराष्ट्रच्या एटीएममधून पैसे भरता येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 7:29 PM

बँक आॅफ महाराष्ट्रच्या एटीएम केंद्रामधून पैसे काढण्याबरोबरच पैसे भरण्याची सुविधा देखील मिळणार

ठळक मुद्दे२ हजार, पाचशे, दोनशे, शंभर आणि ५० रुपांच्या २०० नोटा एकाचवेळी जमा करता येणार १९३५ साली स्थापन झालेल्या बँकेच्या देशभरात १ हजार ८४६ शाखा, १ हजार ८७४ एटीएम

पुणे : बँक आॅफ महाराष्ट्राने ८४ व्या वर्धापनदिनानिमित्त राज्यात ७५ कॅश रिसायकलर्स सुरु केले आहेत. त्यामुळे एटीएम केंद्रामधून पैसे काढण्याबरोबरच पैसे भरण्याची सुविधा देखील मिळणार असल्याची माहिती बँक व्यवस्थापनाकडून देण्यात आली.   एटीएममध्ये सध्या पैसे काढणे, पिन नंबर बदलणे, रक्कम इतर खात्यात वर्ग करणे या सुविधांबरोबर एटीएमकार्डसह अथवा कार्डविना देखील २ हजार, पाचशे, दोनशे, शंभर आणि ५० रुपांच्या २०० नोटा एकाचवेळी जमा करता येणार आहेत. याबाबत माहिती देताना बँकेचे कार्यकारी संचालक ए. सी. राऊत म्हणाले, १९३५ साली स्थापन झालेल्या बँकेच्या देशभरात १ हजार ८४६ शाखा, १ हजार ८ ७४ एटीएम, २ कोटी ६० लाख ग्राहक आणि १३ हजार कर्मचारी आहेत. बँकेची सेवा अधिकाधिक ग्राहकाभिमुख करण्यासाठी ही सुविधा देण्यात आली आहे.  बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक डॉ. एम. व्ही. पटवर्धन म्हणाले, देशाच्या विकासात बँक आॅफ महाराष्ट्रचा सहभाग उल्लेखनीय आहे. नव्या बँकिंग संरचनेतील स्थित्यंतर आणि नव्याने आलेले नियम यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या ताळेबंदात वेगाने परिवर्तन होत आहे. देश वेगाने वाढणाऱ्या जागतिक अर्थव्यवस्थेचा भाग होत असल्याने भारतीय बँकिंग व्यवस्थाही वेगाने वाढत आहे.डॉ. पटवर्धन यांच्या हस्ते दहावी आणि बारावीतील परीक्षेतील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना महा-मेधावी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शाळांच्या मुख्याध्यापकांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. 

टॅग्स :PuneपुणेBank Of Maharashtraबँक ऑफ महाराष्ट्रatmएटीएमMONEYपैसा