बाळराजे आवारे पाटील यांना कुंभेफळ येथील राहत्या घरून पोलिसांनी घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 12:59 IST2026-04-04T12:59:23+5:302026-04-04T12:59:50+5:30
Jalna News: सोलापूरच्या अंजनगावात शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणारे अंबड तालुक्यातील महाकाळा येथील बाळराजे आवारे पाटील यांना शनिवारी दुपारी १२ वाजता करमाड पोलिसांनी कुंभेफळ येथून राहत्या घरून घेतलं ताब्यात घेतले आहे.

बाळराजे आवारे पाटील यांना कुंभेफळ येथील राहत्या घरून पोलिसांनी घेतले ताब्यात
वडीगोद्री - सोलापूरच्या अंजनगावात शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणारे अंबड तालुक्यातील महाकाळा येथील बाळराजे आवारे पाटील यांना शनिवारी दुपारी १२ वाजता करमाड पोलिसांनी कुंभेफळ येथून राहत्या घरून घेतलं ताब्यात घेतले आहे.
अंबड तालुक्यातील महाकाळा येथील बाळराजे आवारे पाटील यांनी शनिवारी महाकाळा येथून हजारोंच्या संख्येने अंजनगावला जाणार असल्याचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळपासून वडीगोद्री , महाकाळा परिसरामध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र पोलिसांनी बाळराजे आवारे पाटील यांना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कुंभेफळ येथील राहत्या घरून करमाड पोलिसांनी आवरे पाटील यांना ताब्यात घेतला आहे. आवारे पाटील यांना ताब्यात घेतल्यानंतर वडीगोद्री महाकाळ येथील पोलीस बंदोबस्त हटवण्यात आला आहे.