शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

बाळासाहेब थोरात म्हणाले, अजित पवार म्हणजे कामाचा वाघ; CM ठाकरेंना दिला कठोर सल्ला!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2021 3:42 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात बोलताना थोरात म्हणाले, "उद्धव ठाकरे आणि आमचा तसा थेट संबंध यापूर्वी कधीच आला नव्हता. त्यांच्या व्यक्तीमत्वाचे वैशिष्ट म्हणजे ते अगदी शांत आणि संयमीपणे कुठल्याही गोष्टीचे नियोजन करतात. पण...

मुंबई - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणजे, कामाचा वाघ आहे. त्यांच्या एवढे काम तेच करू जाणे. पण, लोक काम झाल्यानंतर काम विसरून जातात आणि तुम्ही त्यांच्याशी कसे बोललात हेच लक्षात ठेवतात, हे त्यांनी लक्षात ठेवायला हवे, असा सल्ला काँग्रेस नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पवारांना दिला आहे. याच वेळी त्यांनी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभा विरोधपक्षनेते देवेंद्र फडणवीस काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि अशोक चव्हाण यांनाही सल्ला दिला. ते लोकमतला दिलेल्या एका मुलाखतीत बोलत होते. (Balasaheb Thorat said, Ajit Pawar is the tiger of work; Strict advice given to CM Uddhav Thackeray)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात बोलताना थोरात म्हणाले, "उद्धव ठाकरे आणि आमचा तसा थेट संबंध यापूर्वी कधीच आला नव्हता. त्यांच्या व्यक्तीमत्वाचे वैशिष्ट म्हणजे ते अगदी शांत आणि संयमीपणे कुठल्याही गोष्टीचे नियोजन करतात. कटू निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात आहे. पण, मुख्यमंत्र्याला एका दिवसात अनेक विषय हाताळावे लागतात. त्यामुळे, कटू आणि कठोर निर्णय घेताना चर्चा करून मार्ग काढण्यावर त्यांनी लक्ष द्यायला हवे," असे थोरात यांनी म्हटले आहे.

...म्हणून शरद पवारांसोबत राष्ट्रवादीत गेलो नाही! बाळासाहेब थोरातांनी सांगितला त्यांच्या राजकारणाचा टर्निंग पॉइंट

फडणवीसांनी पक्षातही मित्र निर्माण करायला हवेत -फडणवीसांवर बोलताना थोरात म्हणाले, देवेंद्रजी आणि आम्ही मित्रच आहोत. विरोधी पक्षात असतानाची त्यांची भाषणे मुद्दाम ऐकावी अशीच असायची. त्यांची भाषणे अभ्यासपूर्ण होती, असे म्हणत, आम्ही तर त्यांचे मित्र आहोतच, पण त्यांनी पक्षातही मित्र निर्माण करावेत, असा सल्लाही थोरातांनी फडणवीसांना दिला आहे.

नाना पटोले यांना आम्ही पक्षाध्यक्ष पदासाठी शोधून काढलेले आहेत, पण... -काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासंदर्भात बोलताना थोरात म्हणाले, पटोले यांना आम्ही पक्षाध्यक्ष पदासाठी शोधून काढलेले आहे. ते मेहनतीला नेहमीच तयार असतात, कधी थकत नाहीत. मात्र, त्यांनी थोटा संयम ठेवायला हवा. संयमाची गरज असते, संयमी वृत्तीने गेले तर खूप चांगले होईल. तसेच, थोरातांनी अशोक चव्हाण यांनाही व्यापक होण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय त्यांनी या मुलाखतीत विवीध विषयांवर भाष्य केले.

शांत स्वभावाचा राजकीय जीवनात कधी फटका बसला? महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले...

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातUddhav Thackerayउद्धव ठाकरेAjit Pawarअजित पवार