शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

बालाजीच्या भक्तांची हवाई सेवेला पसंती

By admin | Updated: July 13, 2016 15:28 IST

औरंगाबादेतून तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

ऑनलाइन लोकमत

औरंगाबाद, दि. 13 - औरंगाबादेतून तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेली काही वर्षे तिरुपतीला जाण्यासाठी रेल्वे आणि खाजगी वाहनांचाच पर्याय भक्तांसमोर होता. मात्र,वर्षभरापूर्वी औरंगाबादेतून विमानसेवा सुरू झाली. त्यामुळे आजघडीला बालाजी भक्तांकडून हवाई सेवेला चांगली पसंती मिळत आहे.औरंगाबादहून तिरुपतीला जाणाऱ्या बालाजी भक्तांना आणि हैदराबादहून शिर्डी येथे साई दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांच्या सुविधेसाठी तसेच ही दोन्ही धार्मिकस्थळे जोडण्याच्या उद्देशाने दक्षिणेतील ट्रु जेट कंपनीतर्फे २६ जुलै २०१५ पासून औरंगाबाद-हैदराबाद-तिरुपती विमानसेवा सुरू करण्यात आली. ७२ आसनी असलेल्या या कंपनीच्या विमानसेवेने तिरुपतीला जाण्यास बालाजी भक्तांचा ओढा अधिक आहे. हैदराबाद-तिरुपतीला जाण्यासाठी महिन्याला दीड हजारांवर प्रवासी या विमानसेवेला लाभ घेत आहे. यापूर्वी औरंगाबादेतून स्पाईस जेटने औरंगाबाद-हैदराबाद विमानसेवा सुरू केली होती. परंतु स्पाईस जेटने ही सेवा बंद केली आणि औरंगाबाद-दिल्ली ही विमानसेवा सुरु केली. त्यामुळे बालाजी भक्तांना रेल्वे आणि खाजगी वाहनांशिवाय पर्याय राहिला नाही.

स्पाईस जेटने औरंगाबाद-दिल्ली विमानसेवाही बंद करण्याचा निर्णय घेतला. ३१ जानेवारी २०१५ रोजी शहरातील १८५ प्रवाशांना घेऊन दिल्लीकडे रवाना झालेले स्पाईस जेटचे विमान अखेरचे ठरले. ही विमानसेवा बंद झाल्याने शहराच्या असलेल्या हवाई कनेक्टिव्हिटीत घट झाली. परंतु अवघ्या काही दिवसाच ट्रु जेट कंपनीने औरंगाबादेतून विमानसेवा सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला.त्यामुळे औरंगाबादकर आणि विशेषत: बालाजी भक्तांना मोठा दिलासा मिळाला.भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून ही विमानसेवा कायम राहिली पाहिजे, असे टुरिझम प्रमोटर्स गिल्ड औरंगाबादचे अध्यक्ष जसवंत सिंग म्हणाले. या विमान कंपनीची वर्षभराची सेवा म्हणजे यशाचे उदाहरण असल्याचे चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे निदेशक आलोक वार्ष्णेय म्हणाले. प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून ही सेवा अधिक चांगल्या प्रकारे चालविण्यास प्राधान्य असल्याचे ट्रुजेट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व्ही. उमेश म्हणाले.