मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 18:08 IST2025-10-29T17:43:55+5:302025-10-29T18:08:00+5:30
Badlapur Crime News: पत्नीच्या वर्गमित्राने तिला नाईस डीपी असा मेसेज पाठवल्याने संतापलेल्या पत्नी महिला डॉक्टर असलेल्या पत्नीच्या डोक्यावर खलबत्ता मारून तिला जबर जखमी केल्याची धक्कादायक घटना बदलापूरमध्ये घडली आहे.

मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
पत्नीच्या वर्गमित्राने तिला नाईस डीपी असा मेसेज पाठवल्याने संतापलेल्या पत्नी महिला डॉक्टर असलेल्या पत्नीच्या डोक्यावर खलबत्ता मारून तिला जबर जखमी केल्याची धक्कादायक घटना बदलापूरमध्ये घडली आहे. डॉ. किरण शिंदे असं या घटनेत जखमी झालेल्या महिला डॉक्टरचं नाव असून, पतीने केलेल्या हल्ल्यामध्ये त्यांना जबर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या घटनेबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना जखमी महिला डॉक्टर किरण शिंदे यांनी सांगितले की, माझे पती मुलगा झोपतो त्या रूममध्ये शांत झोपले होते. मी त्यांना चहा घेशील का? असं विचारलं. त्यानंतर ही घटना घडली. याआधीही अशा क्षुल्लक कारणांवरून त्याने मला मारहाण केली होती. दरम्यान, या घटनेच्या एक दिवस आधी आम्ही माथेरानला गेलो होतो. तिथल्या फोटोंवर माझ्या एका शाळेतील मित्राने नाईस डीपी असा मेसेज पाठवला होता. त्याचाही त्यांना राग होता. त्यांनी किचनमधील लोखंडी खलबत्ता माझ्या डोक्यावर मारला. मला ढकललं आणि गळा दाबण्याचा प्रयत्न केला. मी जोराजोरात ओरडले. तेव्हा माझी मुलं जागी झाली आणि त्यांनी मला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण तरीही त्याने मला मारहाण केली. माझ्या डोक्यातून रक्त येऊ लागल्यावर तो भानावर आला आणि मला मारणं थांबवलं.
या महिला डॉक्टरनी पुढे सांगितलं की, भानावर आल्यानंतर माझा पती स्वत:च मला मुलांसोबत डॉक्टरांकडे उपचारांसाठी घेऊन आला. माझ्या डोक्याला टाके पडले आहेत. दरम्यान, आता माझ्या पतीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच त्याला अटक करण्यात यावी अशी माझी मागणी आहे. त्याने याआधीही असा प्रकार केला होता. मात्र मुलांसाठी आम्ही कुटुंबात एकत्र राहत होतो, असे या महिला डॉक्टर किरण शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, या घटनेमुळे बदलापूर शहरात एकच खळबळ उडालेली आहे.