Bachchu Kadu Criticise to PM Modi over book 'Aaj ke Shivaji-Narendra Modi' | 'आज के शिवाजी- नरेंद्र मोदी' पुस्तकावरून बच्चू कडूंची पंतप्रधान मोदींवर जहरी टीका
'आज के शिवाजी- नरेंद्र मोदी' पुस्तकावरून बच्चू कडूंची पंतप्रधान मोदींवर जहरी टीका

मुंबई - महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करण्यात आली आहे. यामुळे महाराष्ट्रातील शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत. तर राजकीय मंडळी देखील पंतप्रधान मोदी आणि पुस्तक लिहिणाऱ्यांवर टीका करत आहेत. प्रहार संघटनेचे नेते आणि मंत्री बच्चू कडू यांनी देखील या प्रकरणावरून मोदींवर कठोर शब्दांत टीका केली. 

अमरावती येथे बोलताना बच्चू कडू म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी सात जन्म घेतले तरी ते शिवाजी महाराजांच्या एका दिवसाचीच काय एका क्षणाचीही बरोबरी करू शकणार नाही. पुस्तकात दिल्याप्रमाणे कोणीही कोणाला अशी उपमा देऊ नये. मोदी स्वत:ला शिवाजी महाराजांचे भक्त किंवा सैनिक म्हणू शकतात. मात्र महाराजांशी तुलना हा शिवरायांचा अपमान आहे. त्यामुळे याचा निषेध करत कडू यांनी पुस्तकावर बंदी आणण्याची मागणी केली आहे. 

दरम्यान मोदी हे पाईक आहेत. पाईक असणाऱ्या लोकांनी मीच राजा म्हणणे योग्य नसल्याचे कडू यांनी सांगितले. काल भाजपाच्या दिल्लीतल्या कार्यालयात प्रकाशित झालेलं 'आज के शिवाजी- नरेंद्र मोदी' हे पुस्तक वादग्रस्त ठरलं आहे. मोदी आणि शिवरायांची तुलना करण्यात आल्यानं सर्वच स्तरातून भाजपावर टीका करण्यात येत आहे.

Web Title: Bachchu Kadu Criticise to PM Modi over book 'Aaj ke Shivaji-Narendra Modi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.