Bacchu Kadu : राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण, दुसर्यांदा चाचणी आली पॉझिटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2021 12:16 IST2021-02-19T11:57:43+5:302021-02-19T12:16:46+5:30
Bacchu Kadu Corona Test Positive : बच्चू कडू यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली असून संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वत:ची काळजी घ्यावी असं देखील म्हटलं आहे.

Bacchu Kadu : राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण, दुसर्यांदा चाचणी आली पॉझिटिव्ह
मुंबई - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 1,09,63,394 वर पोहोचला आहे. तर दुसरीकडे राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येतही सातत्याने वाढ होत आहे. अनेक नेते मंडळींना देखील कोरोनाची लागण झाली आहे. याच दरम्यान राज्यमंत्री बच्चू कडू यांना देखील कोरोनाची लागण झाली असून त्यांची कोरोना चाचणी दुसर्यांदा पॉझिटिव्ह आली आहे. बच्चू कडू यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली असून संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वत:ची काळजी घ्यावी असं देखील म्हटलं आहे.
"माझी कोरोना चाचणी दुसर्यांदा पॉझिटिव्ह आली असून, सध्या मी आयसोलेशनमध्ये आहे. मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वत:ची काळजी घ्यावी, आवश्यक वाटत असेल, तर स्वतःची चाचणी करून घ्यावी" असं कडू यांनी म्हटलं आहे. अचलपूर मतदारसंघाचे आमदार तथा अकोल्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता त्यांची दुसरी कोरोना चाचणी देखील पॉझिटिव्ह आली आहे.
माझी कोरोना चाचणी दुसर्यांदा पॉजिटीव्ह आली असून, सध्या मी आयसोलेशनमध्ये आहे. मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वत:ची काळजी घ्यावी, आवश्यक वाटत असेल, तर स्वतःची चाचणी करून घ्यावी.
— BACCHU KADU (@RealBacchuKadu) February 19, 2021
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण झाली आहे. राजेश टोपे यांनी ट्विट करून कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. तसेच, त्यांनी संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचे आणि कोरोनाची लक्षणे दिसल्यास चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे. "माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईल. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी", असे ट्विट राजेश टोपे यांनी केले आहे. दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. तसेच, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, एकनाथ खडसे यांच्यासह त्यांची सून आणि भाजपा खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईल. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.
— Rajesh Tope (@rajeshtope11) February 18, 2021