शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

बाबूश, माविन यांची हकालपट्टी निश्चित

By admin | Updated: February 24, 2015 03:05 IST

पणजी : पक्षविरोधी कारवाया व तशा प्रकारची वक्तव्ये याची दखल घेऊन आमदार बाबूश मोन्सेरात आणि माविन गुदिन्हो या दोघांचीही

पणजी : पक्षविरोधी कारवाया व तशा प्रकारची वक्तव्ये याची दखल घेऊन आमदार बाबूश मोन्सेरात आणि माविन गुदिन्हो या दोघांचीही पक्षातून हकालपट्टी करण्यावर आता दिल्लीतही शिक्कामोर्तब झाले आहे, अशी माहिती मिळाली. या हकालपट्टीनंतर विधानसभेत काँग्रेसचे केवळ सातच आमदार शिल्लक राहणार असल्याने काँग्रेसला प्रमुख विरोधी पक्ष म्हणून मिळालेली मान्यताही त्यामुळे जाऊ शकते याची कल्पना पक्षाला आली आहे. मोन्सेरात व गुदिन्हो यांनी आतापर्यंत पक्षाविरुद्ध खूपच वक्तव्ये करून प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनाही आव्हान दिले आहे. पणजीच्या पोटनिवडणुकीवेळीही मोन्सेरात यांनी फालेरो यांना आव्हान दिल्याने स्वत: फालेरो यांनी मोन्सेरात यांना घरचा रस्ता दाखवायलाच हवा, अशी भूमिका घेतली. मोन्सेरात यांना पक्षातून काढले नाही तर आपण प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देईन, असेही फालेरो यांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे. मोन्सेरात व गुदिन्हो या दोघांचीही हकालपट्टी करावी, असे फालेरो यांनी दिल्लीस काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना कळविले आहे. त्या नेत्यांनीही यास मान्यता दिली आहे, अशी माहिती मिळाली. फालेरो सोमवारी सायंकाळी दिल्लीस रवाना झाले आहेत. काँग्रेसमध्ये राहिले तरी, मोन्सेरात व गुदिन्हो हे स्वस्थ बसणार नाहीत. त्यामुळे त्यांची हकालपट्टी व्हायलाच हवी, अशी स्पष्ट भूमिका प्रदेश काँग्रेसने घेतली आहे. चाळीस सदस्यीय विधानसभेत एखाद्या पक्षास प्रमुख विरोधी पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी ठराविक आमदार संख्या असणे गरजेचे असते. काँग्रेसच्या आमदारांची संख्या दोनने कमी झाल्यानंतर पक्षाचे विरोधी पक्षनेतेपद अडचणीत येऊ शकते. प्रमुख विरोधी पक्ष ही मान्यता अडचणीत येऊ शकते याची कल्पना माजी केंद्रीय मंत्री अ‍ॅड. रमाकांत खलप व इतरांनी फालेरो यांना दिली आहे. अर्थात काहीही झाले तरी, आता काँग्रेसने मागे हटायचे नाही, असे ठरवले आहे. मोन्सेरात व गुदिन्हो यांनी आतापर्यंत काँग्रेसचे खूप नुकसान केल्याने त्यांची हकालपट्टी झाल्यास काँग्रेसजनांमध्ये योग्य संदेश जाईल व पक्षाच्या प्रतिमेसाठी ते उपयुक्त ठरेल, असे काँग्रेसचे केंद्रीय निरीक्षक चेल्लाकुमार यांचेही मत बनले असल्याचे सूत्रांनी सांगितले. (खास प्रतिनिधी)