विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून बाबुराव कुलकर्णींना उमेदवारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 17:17 IST2019-07-30T17:16:07+5:302019-07-30T17:17:07+5:30
बाळासाहेब थोरात यांच्याकडून उमेदवारीची घोषणा

विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून बाबुराव कुलकर्णींना उमेदवारी
मुंबई: विधानरिषदेच्या औरंगाबाद, जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने बाबुराव उर्फ भवानीदास कुलकर्णी यांना उमेदवारी दिली आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
बाबुराव कुलकर्णी यांच्या उमेदवारीची घोषणा करताना आ. थोरात म्हणाले की, कुलकर्णी हे ज्येष्ठ नेते आहेत. औरंगाबाद व जालना या दोन्ही जिल्ह्यात त्यांचा मोठा जनसंपर्क असल्याने या निवडणुकीत ते निश्चित विजयी होतील. यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री नसीम खान, विधानपरिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आ. शरद रणपिसे, प्रदेश सरचिटणीस पृथ्वीराज साठे उपस्थित होते. या सर्व नेत्यांनी कुलकर्णी यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.