शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

बाबा असे आधार कुटुंबाचा

By admin | Updated: June 20, 2015 22:38 IST

‘तप्तसुर्याची किरणे झेलत सावली देणारे तुम्ही झाड....मुक्या तुमच्या प्रेमभावना हृदयाच्या पडद्याआड’ या उक्तीप्रमाणे बाबा म्हणजे घरातील प्रत्येकाचा आधारस्तंभ असतो.

भाग्यश्री प्रधान,  ठाणे ‘तप्तसुर्याची किरणे झेलत सावली देणारे तुम्ही झाड....मुक्या तुमच्या प्रेमभावना हृदयाच्या पडद्याआड’ या उक्तीप्रमाणे बाबा म्हणजे घरातील प्रत्येकाचा आधारस्तंभ असतो. मुलगी म्हटली की तिच्या आणि बाबांच्या नात्याबद्दल सर्वांनाच ठाउक असते. मुलगी ही त्यांची लाडकी असतेच. मात्र, घरातील प्रत्येक व्यक्तीच बाबांसाठी श्वास असते. प्रत्येकाला आनंदाचे क्षण अनुभवता यावे यासाठी आईइतकेच तेही सतत धावतात. बाबांविषयी फार बोलले जात नसले तरी या बाबांचे आपल्या आयुष्यात असणारे त्यांचे अस्तित्व किती महत्वाचे आहे हे सांगण्याचा दिवस म्हणजे फादर्स डे. घरात स्वत:चा दरारा निर्माण करूनही प्रत्येकाच्या मनात घर करणाऱ्या वडिलांना या फादर्स डे निमित्त श्ुाभेच्छा.. फादर्स डेची सुरूवात सेंट्रल युनायटेड मेथेडोडीस्ट चर्चमध्ये १९०९ साली मदर्स डेबद्दल सांगण्यात आले होते. त्यांनतर वॉशिंगटन येथील सोनोरा स्मार्ट डोड या व्यक्तीला बाबाही तितकेच महत्त्वाचे असल्याचे सतत जाणवू लागले. त्यानंतर दोन वर्षाच्या प्रयत्नानंतर १९१० सालापासून फादर्स डे सेलिब्रेट करण्याची पद्धत रूढ झाली आहे.परिस्थितीशी दोन हात कसे करायचे हे बाबांनी शिकवले. शिक्षण घेण्याबरोबरच चांगली व्यक्ती होण्यासाठी त्यांनी खुप मदत केली. माझ्या गायन कलेला नेहमीच पाठिंबा दिला.रियाज न केल्यावर ओरडणाऱ्या बाबांचा मला नेहमी राग यायचा पण माझे कौतुक झाल्यावर त्यांच्या उर भरून येतो. त्यामुळे ते माझ्या आयुष्यातील खुप महत्त्वाची व्यक्ती आहे. - क्षितीजा जोशी, गायकमला बरे नसले की बाबा कधीही झोपत नाहीत.माझ्या आवडीचे जेवण बनवून खाऊ घालणे हा त्यांचा आवडता छंद आहे. बाबा आणि माझे नाते शब्दात व्यक्त करणे खरच कठीण आहे. कधी कधी माझ्यावर चिडून बाबा न बोलण्याचा आव आणतात आणि मी जेवली की नाही याची खातरजमा करण्यासाठी आईकडे माझी चौकशी करतात तेव्हा मला बाबांच्या ह्रदयाची किंमत कळते. - कृतिका सावंत, नोकरी आई माझ्यावर चिडली तरी घरात माझी बाजू घेणारे बाबाच असतात. आईच्या मताप्रमाणे बाबांनी लाडवलेल्या कन्येचे कसे व्हायचे असा प्रश्न निर्माण झाला की, ती माझी मुलगी आहे.त्यामुळे योग्यच वागणार, असे आईला ठाम बाजावून सांगणाऱ्या बाबांचे अस्तित्व एक दिवस जरी बाहेर गेले तरी लगेच जाणवते. - नम्रता कर्वे, नोकरी