शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

अविनाश बिनिवाले; एका बहुभाषाकोविदाचा सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2018 09:37 IST

गेल्या पाच दशकांहून अधिक काळ भाषाक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या बिनिवाले यांचा लेखन, भाषा अध्ययन आणि अध्यापनाचा प्रवास थक्क करायला लावणारा आहे.

मुंबई - महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे राजभाषा दिनानिमित्त अविनाश बिनिवाले यांचा डॉ. अशोक केळकर भाषाअभ्यासक पुरस्कारने सन्मान करण्यात येणार आहे. गेल्या पाच दशकांहून अधिक काळ भाषाक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या बिनिवाले यांचा लेखन, भाषा अध्ययन आणि अध्यापनाचा प्रवास थक्क करायला लावणारा आहे.

बिनिवाले यांचा जन्म मुंबईमध्ये झाला. त्यानंतर पुणे, मुंबई आणि हैदराबाद येथे झाले. लहानपणापासून विविध भाषांबद्दल त्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली.  एके दिवशी त्यांचे वडील आणि आत्या यांना फ्रेंचमध्ये बोलताना ऐकले, त्यानंतर बिनिवाले यांनी तात्काळ फ्रेंच शिकण्याचा निर्णय घेऊन वडिलांकडून फ्रेंच शिकून घेतले. त्यांची आणखी एक आत्या नागपूरला राहात असे. तेथे या आत्याचा रामकृष्ण मठामुळे बंगाली भाषेशी संपर्क आला होता. बंगाली भाषेची तिच्याकडे असणारी पुस्तके पाहून बिनिवाले यांनी बंगालीही शिकण्यास सुरुवात केली.

साधारणतः मराठी किंवा इत्तर उत्तर भारतीय भाषक दक्षिणेच्या भाषा शिकण्यास विनाकारण भीती बाळगतात असे ते म्हणतात. या भाषांबद्दल अकारण गैरसमज पसरवून त्या शिकायला कठिण आहेत असे म्हटले जाते. पण बिनिवाले यांनी या सर्व दाक्षिणात्य द्रविड भाषा लिपिसह आत्मसात केल्या आहेत. शालेय शिक्षणानंतर बिनिवाले यांनी विद्यापीठाचा जर्मन भाषेचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु केला. मात्र त्यातील फारच थोडे लोक डिप्लोमाच्या अभ्यासक्रमाला येऊ शकले. यामागचे कारण विचारताच सर्वत्र जर्मन हे इंग्रजीतून शिकवले जात होते. त्यामुळे विद्यार्थी पुढे टिकत नसत. त्यामुळे बिनिवाले यांनी परदेशी भाषा मराठीतून शिकवण्याची सोय व्हावी अशी मागणी केली. पुणे विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांच्यापर्यंत हे प्रररण गेले मात्र शिकवण्याची साधने मराठीत नसल्याने जर्मन शिकवणाऱ्या शिक्षकांनी त्यास विरोध केला. शेवटी बिनिवाले यांनीच जर्मनचे मराठीतून व्याकरण आणि जर्मन-मराठी- जर्मन शब्दकोश तयार केला. त्यानंतर त्यांनी गुजरातीमधूनही जर्मनचे व्याकरण आणि शब्दकोश तयार केला. अशाच रितीने त्यांनी फ्रेंचसाठीही काम केले . फ्रेंच आणि रशियन भाषेतील कादंबर्याही त्यांनी अनुवादित केल्या आहेत.

१९८८ साली मणिपूर येथे विद्यार्थ्यांना परदेशी भाषा शिकवण्यासाठी जाण्याची संधी त्यांना मिळाली. ईशान्य भारतामध्ये काम करण्यासारखे भरपूर आहे असे दिसलमयावर बिनिवाले यांनी ईशान्य भारतात प्रदीर्घ काळ अध्यापनाचे काम केले. भाषा या संवादाच्या माध्यम आहेत तशा रोजगाराच्या साधनही आहेत असे ते सर्वांना सांगतात. उगाचच आवड नसलेल्या विषयात पदवी मिळवण्यापेक्षा एखादी भाषा पदवी आणि त्यापुढच्या अभ्यासक्रमांत आत्मसात केली तर त्याचा आयुष्यभरासाठी उपयोग होऊ शकतो असं त्यांचं मत आहे. मराठी मुलांनी थोडे परिश्रम आणि चिकाटीने भाषा शिकण्याचे हे काम केले तर रोजगार आणि जगाचे नवे दालन त्यांच्यासाठी खुले होईल असे बिनिवाले म्हणतात. 

टॅग्स :Marathi Language Day 2018मराठी भाषा दिन 2018