राज्यात सरासरी ६७.६३% मतदान; तळेगाव दाभाडे तळात, तर कोल्हापुरातील मुरगूड अव्वल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 06:47 IST2025-12-04T06:45:54+5:302025-12-04T06:47:04+5:30
मुंबई : राज्यात मंगळवारी झालेल्या २६३ नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये सरासरी ६७.६३ टक्के मतदान नोंदले गेले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ...

राज्यात सरासरी ६७.६३% मतदान; तळेगाव दाभाडे तळात, तर कोल्हापुरातील मुरगूड अव्वल
मुंबई : राज्यात मंगळवारी झालेल्या २६३ नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये सरासरी ६७.६३ टक्के मतदान नोंदले गेले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगूड येथे सर्वाधिक ८८% मतदान झाले असून, पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथे केवळ ४९% मतदानाची नोंद झाली.

कोल्हापूर जिल्ह्यातील मलकापूर (८७%), वडगाव (८६%) आणि पन्हाळा (८५%) या ठिकाणी चांगले मतदान झाले. त्याचवेळी नाशिकच्या त्र्यंबक (८६%) आणि रायगडच्या माथेरान (८५%) येथेही मतदारांचा उत्साह दिसून आला.