औरंगाबाद आरटीओत महिलेने दिला एजंटला चोप

By Admin | Updated: July 19, 2016 18:54 IST2016-07-19T18:54:14+5:302016-07-19T18:54:14+5:30

आरटीओ कार्यालयात मंगळवारी दुपारी पैसे घेऊनही लायसन्स देण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या एका एजंटला संतप्त महिलेचा दुर्गावतार पाहावा लागला. अनेक दिवस उलटूनही लायसन्स

Aurangabad RTO woman gave the agent chop | औरंगाबाद आरटीओत महिलेने दिला एजंटला चोप

औरंगाबाद आरटीओत महिलेने दिला एजंटला चोप

ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 19 - आरटीओ कार्यालयात मंगळवारी दुपारी पैसे घेऊनही लायसन्स देण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या एका एजंटला संतप्त महिलेचा दुर्गावतार पाहावा लागला. अनेक दिवस उलटूनही लायसन्स मिळत नसल्याने पैसे परत करण्याची मागणी महिलेने केली. एजंट टाळाटाळ करीत असल्याचे लक्षात येताच महिलेने मग त्यास चांगलाच चोप दिला. यावेळी वाहनधारक आणि एजंटांची मोठी गर्दी झाली. त्यामुळे काही वेळेसाठी तणावपूर्ण वातावरण झाले
आरटीओ कार्यालयाच्या आवारात ठिकठिकाणी एजंटांनी बस्तान मांडले आहे. तात्काळ काम करून देण्यात येईल,असे त्यांच्याकडून सांगितले जाते. त्यामुळे सर्वसामान्य वाहनधारक त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवतात. अवघ्या काही रकमेत होणाऱ्या कामांसाठी वाहनधारकांकडून जास्तीचे पैसे उकळले जातात. परंतु महिनोन्महिने वाहनधारकांना त्या कामासाठी नुसती प्रतीक्षा करावी लागते. एवढे सर्व होऊनही वाहनधारकांकडून तक्रार करण्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे कार्यालयात एजंटगिरी दिवसेंदिवस वाढतच आहे. पैसे घेऊनही लायसन्स देण्यास टाळाटाळ करणाऱ्या एजंटला कार्यालयाच्या आवारातच चोप देत एका महिलेने मंगळवारी चांगलीच अद्दल घडविली.

Web Title: Aurangabad RTO woman gave the agent chop