शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
3
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
4
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
5
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
6
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
7
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
8
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
9
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
10
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
11
सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
12
एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
13
रणजी करंडक स्पर्धेमध्ये छाप पाडण्यासाठी युवा खेळाडू सज्ज; ऋषभ पंतच्या पुनरागमनावर नजर 
14
भारताने केलेे २-० ने ‘क्लीन स्वीप’; दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात
15
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
16
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
17
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
18
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
19
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
20
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   

Sangli: देहत्यागाचा निर्णय घेतलेल्या कुटुंबाचे मन वळविण्याचा प्रयत्न, दररोज वैद्यकीय तपासणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 16:19 IST

मानसोपचार तज्ज्ञांची धडपड सुरु

अथणी : अनंतपूर (ता. अथणी) येथील तुकाराम पांडुरंग इरकर कुटुंबीयांनी आत्मिक ध्येय साध्य करण्यासाठी प्राणत्यागाचा निर्धार केल्याने प्रशासनाची पळापळ सुरु झाली आहे. त्यांचे मन वळविण्यासाठी बेळगाव येथील जिल्हा मानसोपचार तज्ज्ञ व वैद्यकीय प्रयत्न केले, पण त्यांना अद्याप यश आले नाही. त्यांच्या प्रकृतीची वारंवार तपासणी करण्यात येत असून प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.सांगली जिल्ह्यातील माधवनगर आश्रमात दीक्षा घेतल्यानंतर सहा वर्षांपासून इरकर कुटुंब भक्तिमार्गावर आहे. घरातील सोने-चांदी, जनावरे विकून ते कर्जमुक्त झाले असून चार एकर शेती मुलाला दिली आहे. ६ ते ८ सप्टेंबर या कालावधित परमात्मा त्यांना घेऊन जाणार, असा ठाम विश्वास हे कुटुंब व्यक्त करीत आहे. गेल्या आठ दिवसांपासून इरकर कुटुंबाच्या घरी भक्त व कुतूहलापोटी आलेल्या लोकांच्या रांगा लागल्या आहेत. घराजवळील रस्ताही झुडपांनी आच्छादला आहे. प्रशासनासाठी ही परिस्थिती आव्हानात्मक बनली आहे. आरोग्य अधिकारी व मानसोपचार तज्ज्ञ वारंवार भेट देऊन त्यांना समजावण्याचा प्रयत्न करीत आहेत. बेळगाव जिल्हा मानसोपचार तज्ज्ञ डॉ. उत्तम शेला यांच्या पथकाने भेट घेऊन त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी शिवराज हरोली, महानंदा दोडमणी व विशाल पुजारी यांनी वैद्यकीय तपासणी केली.तुकाराम इरकर यांचा दावा आहे की, रामपाल महाराजांचा आत्मा प्रत्यक्ष त्यांच्या खुर्चीवर येऊन मार्गदर्शन करतो. त्यांच्या सांगण्यावरून घरातील दागदागिने शोधून विक्री करून त्यांनी कर्जफेड केली आहे. भक्तिमार्गातून परतण्याचा कोणताही विचार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.प्रशासन सतत त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी कुटुंबाला वैद्यकीय उपचारासाठी हलवावे लागेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. परिसरातून त्यांच्या जेवणाच्या व आहाराच्या तपासणीची मागणी होत आहे.