७ महिने जुना व्हिडीओ आताच बाहेर का? नरहरी झिरवाळांना बदनाम करण्याचं षडयंत्र; अमोल मिटकरींचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 09:20 IST2026-03-26T09:08:42+5:302026-03-26T09:20:04+5:30

मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

Attempt to Defame an Innocent Man Amol Mitkari Defends Minister Narhari Zirwal | ७ महिने जुना व्हिडीओ आताच बाहेर का? नरहरी झिरवाळांना बदनाम करण्याचं षडयंत्र; अमोल मिटकरींचा आरोप

७ महिने जुना व्हिडीओ आताच बाहेर का? नरहरी झिरवाळांना बदनाम करण्याचं षडयंत्र; अमोल मिटकरींचा आरोप

Amol Mitkari on Narhari Zirwal: राज्यातील राजकीय वातावरण सध्या एका कथित आक्षेपार्ह व्हिडिओमुळे तापले असून, अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ हे मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. एका तृतीयपंथी व्यक्तीसोबतचा त्यांचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. दुसरीकडे मंत्री नरहरी झिरवाळ यांना अडकवण्यासाठी हा व्हिडीओ समोर आणला गेल्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने मांडली आहे.

गुरुवारी रात्री सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मंत्री झिरवाळ एका शासकीय निवासस्थानी एका तृतीयपंथी व्यक्तीसोबत असल्याचा दावा केला जात आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, संबंधित व्हिडिओमधील व्यक्ती ही पवन यादव नावाची ट्रान्सवुमन असून, तिच्या भावानेच या प्रकरणाला वाचा फोडली आहे. पवन यादववर मुंबईतील कुरार पोलीस ठाण्यात खंडणीचे गुन्हे दाखल असल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे.

शासकीय निवासस्थानाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

व्हायरल व्हिडिओमध्ये मंत्र्यांच्या खाजगी कक्षात मद्य आणि अश्लील कृत्य होत असल्याने प्रशासकीय वर्तुळात संताप व्यक्त होत आहे. हा व्हिडिओ सुमारे सात महिन्यांपूर्वीचा असल्याचे सांगितले जात असून, तो आताच जाणीवपूर्वक बाहेर काढण्यात आल्याची चर्चा आहे. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत झिरवाळ यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.

अमोल मिटकरींचा 'षडयंत्रा'चा आरोप

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी झिरवाळ यांची बाजू घेत याला मीडिया ट्रायल म्हटले आहे. "भोंदू बाबांबरोबर काही लोकांचं जे धार्मिक कनेक्शन उघड होतं ते समोर येत आहे असे लक्षात येताच सहा सात महिन्यापूर्वी काढून ठेवलेला झिरवळ साहेबांचा व्हिडीओ आता अचानक कसा बाहेर आणला गेला? राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी व राष्ट्रीय अध्यक्षपदी आदरणीय सुनेत्रा वहिनींची निवड व्हावी ही इच्छा व्यक्त करणारी पहिली व्यक्ती म्हणजे झिरवाळ साहेब! त्यानंतर त्यांच्या ऑफिस मध्ये एसीबीचा ट्रॅप लावणे व नंतर आता हा सात महिन्यापूर्वींचा व्हिडीओ काढून मिडियाला सोपवणे!! एका सरळ माणसाला बदनाम करायचं नंतर मीडिया ट्रायल..हे झारीतील शुक्राचार्य कोण?? अशोक खरात प्रकरण अंगलट येतय म्हणून स्वतःवरील लक्ष विचलित करण्यासाठी केलेला हा प्रकार व हे वंगाळ राजकारण लक्षात येतंय ! सोमवती अमावस्या ते अघोरी पूजा या मागे २ सप्टेंबर २०२५ ते ३१ जानेवारी २०२६," असं अमोल मिटकरी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

झिरवाळ 'नॉट रिचेबल'

या प्रकरणावर झिरवळ यांनी प्रतिक्रिया दिलेली नसून त्यांचे दोन्ही मोबाईल फोन स्विच्ड ऑफ येत आहेत. त्यांच्या कार्यालयाने मात्र अशा कोणत्याही व्हिडिओची कल्पना नसल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, झिरवाळ यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची चर्चा असून, अजित पवार यांच्या पश्चात पक्षात सुरू असलेल्या अंतर्गत वादातून हे प्रकरण उघडकीस आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. लाचखोरीच्या प्रकरणानंतर आता या  आरोपांमुळे नरहरी झिरवाळ यांच्यासमोर मोठे संकट आलं आहे. सरकार यावर काय कारवाई करते, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Web Title : नरहरि झिरवाल को बदनाम करने की साजिश? अमोल मिटकरी का आरोप

Web Summary : एक विवादास्पद वीडियो के कारण मंत्री नरहरि झिरवाल विवादों में घिर गए हैं, जिससे इस्तीफे की मांग हो रही है। एनसीपी ने साजिश का आरोप लगाते हुए सात महीने बाद वीडियो जारी करने पर सवाल उठाया, इसे पार्टी के आंतरिक विवादों और अन्य मुद्दों से ध्यान हटाने के प्रयास से जोड़ा। झिरवाल टिप्पणी के लिए उपलब्ध नहीं हैं।

Web Title : Conspiracy to defame Narhari Zirwal? Amol Mitkari alleges video timing.

Web Summary : A controversial video has embroiled minister Narhari Zirwal, prompting resignation demands. NCP alleges a conspiracy, questioning the video's sudden release after seven months, linking it to internal party disputes and attempts to divert attention from other issues. Zirwal remains unreachable for comment.