शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

सौदी अरेबिया, दिल्ली, मुंबईहून आलेल्या अत्तराचा सोलापुरात दरवळ

By appasaheb.patil | Published: May 18, 2019 2:09 PM

रमजान ईद विशेष : टॅलेंट, खलिफा, ओन्ली वन, नॅनो, रॉयल अत्तरांना चांगली मागणी, सुरमा खरेदीसाठी वाढली गर्दी

ठळक मुद्देशहरात रमजान महिन्यात अत्तरांना विशेष मागणी आहे. इतर इस्लामिक साहित्याशिवाय अत्तराची विक्री चांगल्या प्रकारे होते. यंदा मुंबई, दिल्ली, सौदी अरेबिया, बेंगलोर, हैदराबादहून माल विक्रीसाठी आला आहेशहरात साधारणत: विजापूर वेस, बेगम पेठ, नई जिंदगी, मीना बाजारात छोटी-मोठी मिळून २० ते २५ दुकाने आहेत

आप्पासाहेब पाटील 

सोलापूर : रमजान महिन्यात शहरातील विजापूर वेस, नई जिंदगी परिसरातील अत्तर बाजारात रोजेदारांना नमाजाआधी शरीराला लावण्यासाठी अत्तर व डोळ्यांत घालण्यासाठी सुरमा लागत असतो. रमजान महिन्यामुळे या साहित्याच्या विक्रीमध्ये दुप्पट वाढ झाली आहे. सोलापुरातील विजापूर वेस, बेगमपेठ, नई जिंदगीसह अनेक भागातील दुकाने, शॉपमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अत्तर व सुरमा खरेदी करणाºयांची संख्या वाढत असल्याने विक्रेत्यांमध्येही उत्साह दिसून येत आहे़ यंदा बाजारात टॅलेंट, खलिफा, ओन्ली वन, व्हीआयपी, चॉकलेट, पारले, बीएमडब्ल्यू या अत्तराला मागणी जास्त आहे़ साधारणत: ३ ते ८ मिलिलिटरपर्यंतच्या बाटल्या उपलब्ध असल्याची माहिती अब्दुल शकीर शेळगीकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

ज्याप्रकारे कुरआनमध्ये रोजा ठेवणे, नमाज अदा करणे महत्त्वाचे मानले जाते त्याचप्रमाणे अत्तर व सुरमा लावणे चांगले मानले जाते. यामुळे मुस्लीम समाजातील बांधव विविध प्रकारचे वास देणारे अत्तर प्राधान्याने वापरतात़ दरम्यान, मुस्लीम स्त्रिया या डोळ्यांमध्ये काजळऐवजी सुरमा घालण्याची पद्धत आहे. पुरुषही आपल्या डोळ्यात सुरमा घालतात. गरज आणि उपयोग वाढत गेला तसतसे सुरमादाण्यांमध्येही कलात्मक बदल होत गेल्याची माहिती अत्तर विक्रेते अब्दुल शेळगीकर यांनी दिली.

 बाजारात शेकडो प्रकारचे अत्तर ग्राहकांच्या बजेटनुसार उपलब्ध आहेत. याशिवाय आकर्षक अशा बाटल्यांमध्ये हे अत्तर असल्याने ते ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. शहरातील विजापूर वेस भागातील विक्रेत्यांनी सांगितले की, शहरात मद्रास, हैदराबाद, मुंबई, सौदी अरेबिया आदी भागांतून अत्तर विक्रीसाठी आणण्यात येते. यामध्ये शमामा, जंगम, मक्का मदिना, मजमुआ, व्हाईट ऊद, देहनूल ऊद, जन्नतुल फिरदौस, फसली गुलाब या प्रकारच्या अत्तरांची जास्त मागणी आहे. 

पवित्र नमाज अदा करताना आपल्या डोळ्यांमध्ये सुरमा लावण्याबाबत सांगण्यात आले आहे. या सुरमाचेदेखील सोलापूरमध्ये साधारण १५ ते २० प्रकार उपलब्ध आहेत. सिन्नर,  मुंबई,  पुणे यांसारख्या शहरांसह परराज्यांमधून व अरब राष्ट्रांमधूनदेखील सुरमा विक्रीसाठी आणला जात असल्याची माहिती विजापूर वेस येथील अत्तर विक्रेते इलियास शेख यांनी दिली़ 

अत्तराचे साबण...- आत्म्याचं अन्न म्हणजे ‘रू की गीजा’ अशी ओळख असलेल्या अत्तराला दरवर्षी मोठी मागणी असते. ग्रीन मुश्क, चॅलेंज, ओन्ली वन, गुलनाज, गुलमोहर, डी लव्ह, फिरदोस, असिल, रॉयल प्रोफेसी, तुफान, हुदा आदी १०० प्रकारचे अत्तर सध्या विजापूर वेस परिसरातील दुकानांमध्ये विक्रीसाठी दाखल झाले आहेत. २० रुपयांपासून २ हजार रुपयांपर्यंत अत्तराची किंमत असून, रमजानमध्ये याला खूप मान असतो. यंदाच्या वर्षी प्रथमच अत्तराचा साबण बाजारात दाखल झाला आहे. अत्तराचा साबण ग्राहकांचे आकर्षण ठरत आहे, अशी माहिती नदीम शेख यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

सुरम्याचे प्रकार..- ९, १३, २४ असे नंबर असलेल्या सुरम्यांसह खोजाती, अस्माह साधा, ममेरा, उत्तम ब्लॅक, खास व्हॉईट, रेड स्मिथ, डीलक्स असे प्रकार उपलब्ध आहेत. सध्या बदामाचे तेल मिक्स असलेला सुरमा अधिक पसंत केला जात आहे. महिलांमध्ये मुमताज, डीलक्स, कामत आदी सुरमा प्रसिद्ध आहे. 

या अत्तरांना मागणी - खलिफा, टॅलेंट, नॅनो, रॉयल, चॅनेल, एक्स, हीना, रुहे गुलाब, मोगरा, चार्ली, फंटाशिआ, असिल, जन्नतुल नईम, रतलाम, सिगार, उद, हायवॉक, रसासी, हयाशा, रॉयल ब्लू, अल रियाब, राशा, मदिना, मक्का अत्तर बाजारात विक्रीसाठी आहे. ग्राहकांना अनेक पर्याय आहेत. याशिवाय सौदी अरेबियाहून आलेले शमामा, जंगम, मक्का मदिना या अत्तरांना मागणी सर्वाधिक आहे़ 

शहरात रमजान महिन्यात अत्तरांना विशेष मागणी आहे. इतर इस्लामिक साहित्याशिवाय अत्तराची विक्री चांगल्या प्रकारे होते. काही जणांकडून महागड्या अत्तरांना मागणी असल्याने ते विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. यंदा मुंबई, दिल्ली, सौदी अरेबिया, बेंगलोर, हैदराबादहून माल विक्रीसाठी आला आहे़ शहरात साधारणत: विजापूर वेस, बेगम पेठ, नई जिंदगी, मीना बाजारात छोटी-मोठी मिळून २० ते २५ दुकाने आहेत़ यंदा अत्तराच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही़ ५० रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंतच्या बाटल्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत़ - अब्दुल शकीर शेळगीकरअत्तर विक्रेते

टॅग्स :SolapurसोलापूरRamzanरमजानRamzan Eidरमजान ईदMarketबाजार