Attack on Mohit Kamboj By Shivsena : मातोश्रीबाहेर जोरदार राडा! मोहित कंबोज यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला; पोलिसांचा हस्तक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 09:59 PM2022-04-22T21:59:50+5:302022-04-22T22:06:59+5:30

Mohit Kamboj car under Attack: नवनीत राणा आणि रवी राणा यांनी उद्या सकाळी मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचे आव्हान दिले आहे. यामुळे कलानगरमध्ये मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक जमले आहेत.

Attack on BJP leader Mohit Kamboj car By Shivsena worker outside Matoshri on navneet Ravi Rana Hanuman Chalisa issue | Attack on Mohit Kamboj By Shivsena : मातोश्रीबाहेर जोरदार राडा! मोहित कंबोज यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला; पोलिसांचा हस्तक्षेप

Attack on Mohit Kamboj By Shivsena : मातोश्रीबाहेर जोरदार राडा! मोहित कंबोज यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला; पोलिसांचा हस्तक्षेप

Next

थोड्या वेळापूर्वी मातोश्री परिसरात भाजपा नेते मोहित कंबोज यांच्यावर हल्ला झाला आहे. कंबोज यांची गाडी शिवसैनिकांनी पाहिली आणि तिकडे धाव घेतली. कंबोज यांचे सुरक्षा रक्षक आणि पोलिसांनी शिवसैनिकांना आवरले. कंबोज रेकी करण्यासाठी आलेले असा आरोप शिवसैनिकांनी केलाआहे. 

मातोश्रीबाहेरील रस्त्यावरून मोहित कंबोज यांची गाडी जात होती. त्यावेळी शिवसेनेच्या कार्यकरत्यांनी त्यांची गाडी ओळखली आणि त्यांच्या कारवर हल्ला केला. यावेळी कंबोज यांचे सुरक्षारक्षक आणि तिथे असलेल्या पोलिसांनी हस्तक्षेप करत कंबोज यांची सुरक्षा केली. यावेळी कंबोज यांना पुढे पाठवून देण्यात आले. कंबोज आता पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी निघाल्याचे सांगण्यात येत आहे. 

नवनीत राणा आणि रवी राणा यांनी उद्या सकाळी मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचे आव्हान दिले आहे. त्यावर शिवसेनेकडून राणा दाम्पत्यानं मुंबईत येऊन दाखवावं असं आव्हा न देण्यात आलं आहे. शिवसेनेचं आव्हान स्वीकारत राणा दाम्पत्य आज मुंबईत दाखल झालं असून मुंबई पोलिसांनी त्यांना मातोश्री परिसरात न जाण्याची नोटीस बजावली आहे. यावर शिवसैनिक मातोश्रीबाहेर मोठ्या प्रमाणावर गोळा झाले आहेत. 

मी एका लग्नसमारंभाला उपस्थित राहून घरी जात होतो. माझ्या गाडीवर शिवसैनिकांना हल्ला केला. गाडी तोडण्यात आली. मुंबई पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करावी, असे कंबोज यांनी सांगितले. 
 

Web Title: Attack on BJP leader Mohit Kamboj car By Shivsena worker outside Matoshri on navneet Ravi Rana Hanuman Chalisa issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.