शहरं
Join us  
Trending Stories
1
“राष्ट्रभक्तीचा नवा अध्याय, सत्तेसाठी भाजप+एमआयएम अकोट पॅटर्न”; ठाकरे गटाच्या नेत्यांची टीका
2
कल्याणमध्ये २१ वर्षीय एअर होस्टेसचा प्रियकराकडून छळ; ६ वर्षांच्या प्रेमाचा असा झाला भीषण शेवट, आरोपी अजूनही मोकाट?
3
आईच्या पिंडदानाची तयारी सुरू होती, तेवढ्यात फोन खणखणला अन्...; असं काही घडलं की सगळेच झाले हैराण!
4
Wife सोबत मिळून पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये करा गुंतवणूक; महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
5
इराणच्या खामेनी विरोधात बंड पुकारणं पडणार महागात! 'या' २६ वर्षीय तरुणाला दिली जाणार फाशी?
6
टॅरिफविरोधात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला तर अमेरिका संपली...; डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी भीती
7
११ वर्षांनी अद्भूत योगात मकरसंक्रांती २०२६: संक्रमण पुण्य काल कधी? पाहा, महत्त्व-मान्यता
8
चांदीची ऐतिहासिक भरारी! २.६८ लाखांचा टप्पा पार; आता ३ लाखांचे लक्ष्य? खरेदीची संधी की नफावसुलीची वेळ?
9
अमेरिकेने व्हेनेझुएलावर अज्ञात शस्त्र वापरले, मादुरोंचा गार्ड म्हणाला, "नाक-तोंडातून रक्त येत होतं आणि..."
10
IMPS द्वारे पैसे पाठवणं महागणार; 'या' दिग्गज सरकारी बँकेनं कोट्यवधी ग्राहकांना दिला मोठा झटका
11
PNB मध्ये जमा करा ₹२,००,०००, मिळेल ₹८१,५६८ चं फिक्स व्याज; जाणून घ्या संपूर्ण स्कीम
12
इथे कंपन्यांना सर्व्हिस सेंटर उघडता येईनात...! मारुती पेट्रोल पंपावरच कार सर्व्हिस करून देणार...
13
तातडीने इराण सोडा, आर्मेनिया किंवा तुर्कीमार्गे बाहेर पडा! अमेरिकेचे आपल्या नागरिकांना आदेश
14
प्रसिद्ध हॉलिवूड स्टारने व्यक्त केली शाहरुख खानसोबत काम करण्याची इच्छा; म्हणाला, 'त्याने मला...'
15
मराठी मुलांना नोकरी देण्यास उद्योगपतीचे स्वागत केले; गैर काय? फडणवीस यांचा ठाकरेंवर हल्लाबोल
16
इराणसोबत व्यापार कराल तर २५% टॅरिफ द्यावा लागेल...! ट्रम्प यांची पुन्हा धमकी; या देशांवर होणार थेट परिणाम
17
२०२६ची पहिली षट्तिला एकादशी: अनंत कृपा लाभेल, काही कमी पडणार नाही; ‘असे’ करा व्रत पूजन!
18
Stock Market Holidays: गुरुवार १५ जानेवारीला शेअर बाजाराचं कामकाम राहणार बंद; काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या
19
६ दिवसांत ५ ग्रहांचे गोचर: ७ राशींची संक्रांत संपणार, लक्षणीय लाभ; पैशांचा ओघ, सुखाचा काळ!
20
आजचे राशीभविष्य, १३ जानेवारी २०२६: नोकरी, व्यवसायात लाभ, नशिबाची साथ; अनुकूल दिवस
Daily Top 2Weekly Top 5

अटल सेतूला जोडणाऱ्या रस्त्याला तडे; नाना पटोले पुलावर पोहोचले, सरकारला घेरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 17:40 IST

Atal Setu Cracks News: अटल सेतूच्या पुलाला जोडणाऱ्या रस्त्याला भेगा पडायला सुरुवात झाली आहे. पुलाच्या रस्त्याच्या भरावासाठी घातलेली माती खचायला लागली असून रस्त्याला मोठमोठ्या भेगा पडू लागल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीपूर्वी विक्रमी वेळेत पूर्ण करत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शिवडी ते न्हावाशेवा अटल सेतूचे उद्घाटन करण्यात आले होते. आता याला पाच महिने होत नाही तोच पहिल्याच पावसाने रस्ते भेगाळू लागले आहेत. भेगाळल्या भुई परी अटल सेतूपर्यंत जीव मुठीत घेऊन लोकांना जावे लागणार आहे. 

अटल सेतूच्या पुलाला जोडणाऱ्या रस्त्याला भेगा पडायला सुरुवात झाली आहे. भरावासाठी घातलेली माती खचायला लागली असून रस्त्याला मोठमोठ्या भेगा पडू लागल्या आहेत. यामुळे एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात असून मुंबईच्य ड्रीम प्रोजेक्ट कोस्टल रोडला लागलेल्या गळतीनंतरची ही दुसरी महत्वाकांक्षी प्रकल्पाची पोलखोल झाली आहे. 

यामुळे अटल सेतूच्या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले असून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील या भेगाळलेल्या अटल सेतूच्या रस्त्याची पाहणी केली आहे. हा मुद्दा विधानसभा निवडणूक आणि पावसाळी अधिवेशन तोंडावर असताना विरोधी पक्ष हातात घेण्याची शक्यता आहे.

‘अटल सेतू’ शनिवार दि. १३ जानेवारीपासून सकाळी ८ वाजेपासून सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. सुरुवातीला छोट्या वाहनांसाठी ५०० रुपये टोल जाहीर झाला होता, तो नंतर कमी करून २५० रुपये करण्यात आला. ३१ डिसेंबर २०२४ पर्यंतच्या टोलदरानुसार येथून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना २५० रुपयांपासून १५८० रुपये एकेरी प्रवासासाठी मोजावे लागत आहेत. या महागड्या टोलमुळे सरकारवर टीकाही झाली होती. सेतू विविध जोडरस्त्यांनी मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, वसई-विरार, नवी मुंबई, रायगडला जोडला गेला आहे. यामुळे मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये अडकण्याचा त्रास कमी झाला आहे. 

टॅग्स :Mumbaiमुंबईroad transportरस्ते वाहतूकNana Patoleनाना पटोले