अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 20:54 IST2026-04-07T20:52:46+5:302026-04-07T20:54:59+5:30

Ashok Kharat viral video case: अशोक खरात याचे महिलांसोबत संबंध ठेवतानाचे व्हिडीओ लीक झाले. हे व्हिडीओ काही जणांकडून सोशल मीडियावर पसरवण्यात आले. तर काहींनी त्याची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. 

Ashok Kharat's sexual relation with womans videos sold for Rs 15 to 20, case registered | अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक

अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातने महिलांवर केलेल्या अत्याचाराचे काही व्हिडीओ लीक झाले. हे व्हिडीओ सोशल मीडियावरुन व्हायरल झाले. यातील १५ ते १७ व्हिडीओ विकण्यात आल्याचे समोर आले असून महाराष्ट्र सायबर पोलिसांनी अशोक खरात आणि इतर काही सोशल मीडिया हॅण्डल विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

महाराष्ट्र सायबरचे अतिरिक्त पोलीस महासंचालक यशस्वी यादव यांनी याबद्दल माहिती दिली. अशोक खरात आणि इतर काही सोशल मीडिया अकाऊंट विरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले. 

प्रत्येक व्हिडीओ १५ ते २० रुपयांना विकला

अशोक खरात आणि इतर काही सोशल मीडिया अकाऊंटवरून आक्षेपार्ह व्हिडीओ पसरवण्यात आले. यातील १५ ते १७ व्हिडीओ ऑनलाइन विकण्यात आले. प्रत्येक व्हिडीओ १५ ते २० रुपयांना विकण्यात आला आहे. पीडितांची ओळख यामुळे उघड होऊ शकते, असे सांगत त्यांनी हे शेअर करणाऱ्यांना कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.  

व्हिडीओची ऑनलाइन विक्री करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक यादव यांनी दिली आहे. 

अशोक खरातच्या कार्यालयातील व्हिडीओ 

भोंदू अशोक खरात याने अनेक विवाहित आणि अविवाहित महिलांना समस्यांचे निराकरण करून देतो म्हणत आपल्या जाळ्यात ओढले होते. अनेक महिलांवर त्याने अनेक वेळा अत्याचार केले. भेटायला आल्यानंतर तो आपल्या कार्यालयातच महिलांवर अत्याचार करत होता. 

त्याची ही काळी कृत्ये स्पाय कॅमेरा लावून त्याच्याकडे काम करणाऱ्या व्यक्तीने रेकॉर्ड केली होती. यातीलच काही व्हिडीओ लीक झाले. हे व्हिडीओ सोशल मीडियातून पसरली. सरकारने पीडितांची ओळख उघड होईल असे कोणतेही कृत्य न करण्याचे आवाहन केले होते. पण, काही सोशल मीडिया हॅण्डलवरून हे व्हिडीओ पसरवले गेले. 

Web Title : अशोक खरात के अश्लील वीडियो बेचे गए; मामला दर्ज, जल्द गिरफ्तारी

Web Summary : अशोक खरात के लीक हुए वीडियो, जिसमें दुर्व्यवहार दिखाया गया है, ऑनलाइन ₹15-20 में बेचे गए। पुलिस ने आईटी एक्ट के तहत मामला दर्ज किया और आरोपी को गिरफ्तार करेगी। खरात ने अपने कार्यालय में महिलाओं का शोषण किया, जिसे एक कर्मचारी ने गुप्त रूप से रिकॉर्ड किया।

Web Title : Ashok Kharat's Obscene Videos Sold; Case Filed, Arrest Soon

Web Summary : Ashok Kharat's leaked videos, showing abuse, were sold online for ₹15-20. Police filed a case under IT Act and will arrest the accused. Kharat exploited women in his office, secretly recorded by an employee.