Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरण: रुपाली चाकणकर यांचा महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 22:28 IST2026-03-20T22:27:32+5:302026-03-20T22:28:46+5:30

Rupali Chakankar Resignation: नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याच्यावर गंभीर गुन्हे दाखल झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

Ashok Kharat Case: Rupali Chakankar resigns as Women's Commission Chairperson! | Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरण: रुपाली चाकणकर यांचा महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा!

Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरण: रुपाली चाकणकर यांचा महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा!

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याच्यावर गंभीर गुन्हे दाखल झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे थेट राज्य महिला आयोगापर्यंत पोहोचल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

सिन्नर तालुक्यातील भोंदू अशोक खरात हा अंकशास्त्राच्या आधारे भविष्य सांगण्याचा दावा करून महिलांची फसवणूक आणि अत्याचार करत असल्याचा आरोप आहे. पोलिसांनी खरातच्या कार्यालयावर छापा टाकला असता, तिथे ५८ वादग्रस्त व्हिडिओ असलेला एक पेन ड्राईव्ह हस्तगत करण्यात आला आहे.  या व्हिडीओमध्ये राजकीय क्षेत्रातील महिलांसह विविध क्षेत्रांतील नामांकित महिलांचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

या प्रकरणातील मुख्य आरोपी अशोक खरात आणि रुपाली चाकणकर यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली. विशेष म्हणजे, खरातच्या 'श्री शिवनिका संस्थान'मध्ये चाकणकर या विश्वस्त पदी कार्यरत होत्या. महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या संस्थेच्या प्रमुखच अशा गंभीर गुन्ह्यातील आरोपीच्या संस्थेत कशा? असा सवाल उपस्थित करत विरोधकांनी आणि सामाजिक संघटनांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली.  वाढता रोष आणि प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, रुपाली चाकणकर यांनी अखेर आपल्या पदाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला.

अशोक खरात प्रकरणामुळे रुपाली चाकणकर पुरत्या अडचणीत सापडल्या. चाकणकरांनी पोलीस महासंचालकांची  भेट घेऊन चौकशी आदेश दिले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाकणकर यांना तातडीने राजीनामा देण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर  महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर देवगिरी बंगल्यावर दाखल झाल्या. यावेळी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि चाकणकर यांच्यामध्ये जवळपास २० ते २५ मिनिटं चर्चा झाली. त्यानंतर रुपाली चाकणकर यांनी आपला राजीनामा सुनेत्रा पवार यांच्याकडे सुपूर्द केला.

Web Title : अशोक खरात मामले में रूपाली चाकणकर का महिला आयोग अध्यक्ष पद से इस्तीफ़ा

Web Summary : अशोक खरात पर आरोपों और विवाद के बीच, महिला आयोग की अध्यक्ष रूपाली चाकणकर ने इस्तीफा दे दिया। खरात धोखाधड़ी और दुर्व्यवहार के आरोपों का सामना कर रहे हैं। खरात के साथ चाकणकर की तस्वीरें वायरल होने से उनके संगठन में उनकी भागीदारी पर सवाल उठे। बढ़ते दबाव के कारण उन्होंने इस्तीफा दे दिया।

Web Title : Rupali Chakankar Resigns as Women's Commission Chief Amid Ashok Kharat Scandal

Web Summary : Following allegations against Ashok Kharat, and amid controversy, Women's Commission chairperson Rupali Chakankar resigned. Kharat faces charges of fraud and abuse. Photos of Chakankar with Kharat went viral, raising questions about her involvement with his organization. Mounting pressure led to her resignation.